नवी दिल्ली  : पूर्व दिशा उंच असेल तर घरात दारिद्य आणि अशांतीचा वास असतो. घराच्या मालकाला दारिद्य येऊ शकतं, संतती अस्वस्थ आणि मंदबुद्धी असू शकते, पूर्व दिशेची खोली खाली ठेवली, तर संततीस अडचणी येतात, किंवा अपंग जन्माला येते, असं म्हटलं जातं.


पूर्व दिशेचे वास्तू दोष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्व दिशेला बेड रूम असेल, तर घराचा कर्ता पुरूष चिंतेत आणि अशांत असतो, जर पूर्व दिशेत किचन असेल, तर कुटुंब आणि कर्त्यापुरूषाला नुकसान होते. पूर्व दिशेला देव्हारा असेल, तर पती-पत्नी मतभेद होतात. अशांती आणि वाद कायम होत राहतात. पूर्व दिशेला जीना असेल, तर हृदयरोगासारखे प्रकार होतात. पूर्व दिशेला टॉयलेट असेल, तर घर अशांत राहतं. पूर्व दिशेला जलस्त्रोत असेल, तर घरात अशांती असते.


वास्तू आणि पूजा घर


ज्या जागी देवाचा वास आहे, त्या दिशेत स्टोअर, शौचालय बनवू नये, पूजा घराच्या खाली किंवा वरही शौचायलय नसावे. वास्तूशास्त्रानुसार बेडरूममध्ये पूजा घर नसावं. पूजा घरातील मूर्त्यांचं मुख हे उत्तर किंवा दक्षिण दिशेला नसावं. पूजा घराचे खिडकी, दरवाजे पश्चिमेला नको, तर उत्तर किंवा पूर्व दिशेला हवेत. पूजा घराच्या समोर देवाची मूर्ती ठेवा, पूजा घराचा दरवाजा लाकडाचा नसावा, पूजा घरात मंदिराचा घुमट नसावा. भिंतीवर फिकट पिवळा रंग दिला तर चालेल. फरशी फिकट पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची असावी.