मुंबई : अनेकदा आपण खूप मेहनत करुनही त्याचा मनासारखा फायदा आपल्याला मिळत नाही. पैशांची तंगी सतावते. यासाठी अनेक कारणे कारणीभूत असतात. वास्तुदोष असल्यामुळेही पैशाबाबतच्या समस्या सतावतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. तुम्ही दररोज देवाच्या मूर्तीसमोर फूल वाहत असाल तर संध्याकाळी ते फूल तेथून काढा. सुकलेल्या फुलामुळे घरात नकारात्मक वातावरण तयार होते.


2.घरात कधीही कचरा साठू देऊ नका. वेळोवेळी कचरा बाहेर फेका.


3. दूध अथवा डेअरी उत्पादने कधीही उघडी ठेवू नका. नेहमी असे पदार्थ ढाकून ठेवा. 


4. बाहेरुन आल्यानंतर बूट, मोजे इतरत्र फेकून देऊ नका. जागच्या जागी ठेवा.


5. घरात लहान रोपटी असल्यास ते केवळ ऑक्सिजन हवेत सोडतात. तसेच हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात.


6. काटेरी झाडे कधीही घरात ठेवू नयेत. यामुळे घरात दारिद्रय आणतात. तसेच आरोग्याच्या समस्याही उद्भवतात. 


7. घरातील कोणतेही ठिकाण रिकामे ठेवू नका. वास्तुनुसार, रिकाम्या जागी नकारात्मकता अधिक असते.