मुंबई : जपानी ज्य़ोतिषशास्त्रात ब्लडग्रुपनुसार लोकांच्या स्वभावाबाबतची माहिती दिली जाते. मुख्यत्वे ४ प्रकारचे ब्लडग्रुप असतात A, B, O आणि AB. यातही उपप्रकार असतात ते म्हणजे A+ आणि A-, B+ आणि B-, O+ आणि O-, AB+ आणि AB-.


जाणून घ्या ब्लड ग्रुपवरुन व्यक्तीचा स्वभाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ए पॉझिटिव्ह A(+) - ज्यांचा ब्लडग्रुप ए पॉझिटिव्ह असतो त्यांच्यात चांगली नेतृत्वक्षमता असते. सगळ्यांना एकत्र घेऊन तसेच विश्वासत घेऊन काम करण्यावर त्यांचा विश्वास असतो. तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे असतात. पटकन एखाद्यावर विश्वास ठेवत नाहीत. आकर्षक व्यक्तीमत्व असते. स्पष्टवक्ते असल्याकारणाने टीकेचे धनी ठरतात.


ए निगेटिव A(-) - अशा व्यक्ती मेहनती असतात. कठीण परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर ते यश मिळवतात. जीवनात यश मिळवायचे असल्यास मेहनतीशिवाय पर्याय नाही हे यांचे सूत्र असते. 


एबी पॉझिटिव्ह AB(+) - अशा व्यक्तींचा स्वभाव समजून घेणे कठीण असते. अशा व्यक्ती कधी काय विचार करतील याचा अंदाज लावणेही कठीण असते. त्यांच्या मनात कधी काय सुरु असेल हे सांगता येत नाही. 


एबी निगेटिव्ह AB (-) - या व्यक्ती खूप हुशार असतात. सहजपणे समोरच्याचे बोलणे समजावून घेतात. नेहमी हटके विचार करतात. 


ओ पॉझिटिव्ह O (+) - नेहमी दुसऱ्यांना मदत करण्यास या व्यक्ती तत्पर असतात. दुसऱ्यांना मदत करताना त्या कधीही मागे हटत नाहीत. 


ओ निगेटिव्ह 0(-) - यांचे विचार फारच संकुचित असतात. या व्यक्ती स्वार्थी असतात. दुसऱ्यांचा विचार करण्याआधी स्वत:बाबत अधिक विचार करतात. नवे विचार पटकन स्वीकारत नाहीत. 


बी पॉझिटिव्ह B(+) - या व्यक्ती दयाळू स्वभावाच्या असतात. दुसऱ्याला मदत करण्यास या व्यक्ती नेहमी तयार असतात.यांच्यासाठी नाती महत्त्वाची असतात. दुसऱ्यांसाठी नेहमी काही ना काही करत राहणे अशी यांची वृत्ती असते. 


बी निगेटिव्ह B(-) - अशा व्यक्तींचा दृष्टिकोन नकारात्‍मक असतो. दुसऱ्यांपेक्षा स्वत:चा विचार अधिक करतात.