एकादशीच्या दिवशी ही चार कामे कधीही करु नका...
आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. शास्त्रात या एकादशीला कामिका एकादशी असेही म्हटले जाते.
मुंबई : आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. शास्त्रात या एकादशीला कामिका एकादशी असेही म्हटले जाते.
एकादशी तिथी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. शास्त्रात सांगितलेय की या दिवशी मांस-मच्छी, लसूण, कांदा, अंडी या तामसी पदार्थांचे सेवन एकादशीच्या दिवशी करु नये.
एखाद्या व्यक्तीची निंदा करणे हे शास्त्रात पाप मानले जाते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी वा इतर दिवशी कोणत्याही व्यक्तीची निंदा करु नये.
एकादशीच्या दिवशी भात अथवा भाताचे पदार्थ खाऊ नये.
या दिवशी दारुचे सेवन करणेही शास्त्रात निषिद्ध मानले जाते.