लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी माघ पोर्णिमेच्या रात्री हे करा
माघ मासातील पोर्णिमेला शास्त्रात विशेष महत्त्व असते. या दिवशी गंगेत स्नान केल्यास त्रास दूर होतात असे म्हटले जाते.
मुंबई : माघ मासातील पोर्णिमेला शास्त्रात विशेष महत्त्व असते. या दिवशी गंगेत स्नान केल्यास त्रास दूर होतात असे म्हटले जाते.
पुराणात असं सांगण्यात आलंय की या दिवशी भगवान विष्णू गंगाजल येथे निवास करतात. त्यामुळे गंगास्नानाने अधिक लाभ होतो. तसेच तन आणि मन शुद्ध होते.
या दिवशी व्रत केल्यास धन, लक्ष्मी, विद्या प्राप्त होते. पुराणात सांगितल्याप्रमाणे या दिवशी विशेष उपाय केल्यास धनलक्ष्मी प्रसन्न होते.
या पोर्णिमेच्या रात्री १२ वाजल्याच्या सुमारास महालक्ष्मीची भगवान विष्णूसह पुजा करा तसेच घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावल्यास लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात निवास करते. या दिवशी दान करणेही शुभ असते. या दिवशी गरजूंना, गरीबींना दान करणे चांगले.