मुंबई: शनिवार म्हणजे आठवड्यातला चांगला वार असा समज आहे. शनिवारी सुट्टी असल्यामुळे अनेक जण शॉपिंगला जाणं पसंत करतात. पण शनीचा दिवस असल्यामुळे काही वस्तू विकत घेणं टाळावं असा सल्ला ज्योतिषी देतात. 


लोखंड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी लोखंडाच्या वस्तूंचं दान करायचं विशेष महत्त्व आहे. शनिवारी लोखंडाचं दान केल्यामुळे शनीदेव प्रसन्न होतात, तसंच व्यापारातला नफा वाढतो, असं मानलं जातं. पण असं असलं तरी लोखंडाच्या वस्तू शनिवारी खरेदी करू नयेत, असं सांगितलं जातं. 


तेल


शनिवारी तेल दान करावं, पण तेल विकत घेऊ नये, ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी तेल विकत घेतल्यानं आजार व्हायची शक्यता असते. 


मीठ


शनिवारी मीठ विकत घेतल्यानं कर्ज वाढतं, त्यामुळे शनिवारी मीठ विकत घेणं टाळावं असा सल्ला ज्योतिषी देतात. 


कात्री


शनिवारी कात्री विकत घेतली तर नातेसंबंधांमधील तणाव वाढतात, तसंच नाती तुटली जातात, असं बोललं जातं. 


काळे तिळ


शनिवारी काळे तिळ शनीला वाहिल्यामुळे शनीदेव प्रसन्न होतात, पण हे तिळ विकत घेतल्यानं कामांमध्ये बाधा येते, असा समज आहे. 


काळे बूट


शनिवारी काळे बूट विकत घेतले तर कामांमध्ये अडथळे येतात असं ज्योतिषी सांगतात. 


अभ्यासाच्या वस्तू


अभ्यासाच्या वस्तू म्हणजेच वही, पेन, पेन्सिल यासारख्या वस्तू शनिवारी घेणं टाळावं, त्याऐवजी या वस्तू गुरुवारी विकत घ्याव्यात, असं सांगितलं जातं.