चुकूनही महालक्ष्मीचा असा फोटो खरेदी करु नका...नाहीतर होईल नुकसान
हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे दिवाळी. दिवाळीतील मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मी मातेच्या पुजेचे महत्त्व अधिक असते. लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी तसेच तिची कृपादृष्टी कायम राहण्यासाठी तिची या दिवशी मनोभावे पूजा केली जाते.
मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे दिवाळी. दिवाळीतील मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मी मातेच्या पुजेचे महत्त्व अधिक असते. लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी तसेच तिची कृपादृष्टी कायम राहण्यासाठी तिची या दिवशी मनोभावे पूजा केली जाते.
शास्त्रानुसार असं मानल जात की जर तुम्ही महालक्ष्मीच्या तसबिरीची पुजा करताय तर काही गोष्टी ध्यानात घेणे आवश्यक असते. त्यामुळे महालक्ष्मीची तसबीर खरेदी करण्याआधी खालील गोष्टींवर लक्ष द्या.
महालक्ष्मीच्या फोटोमध्ये जर ऐरावत असतील तर ते शुभ मानले जाते. त्यासोबतच लक्ष्मीमातेच्या दोन्ही बाजूला वाहत्या पाण्यात हत्ती उभे असून नाण्याचा पाऊस पाडत आहेत असे चित्र घरात असेल तर त्या घरात पैशांची कमतरता जाणवत नाही.
तसेच कमळावर विराजमान झालेले लक्ष्मी मातेचे चित्रही फलदायी ठरते. अशा तसबिरीची पूजा केल्याने लक्ष्मीमाता नेहमी आपल्या घरात विराजमान राहते.
उभी असलेली लक्ष्मी मातेचा फोटो कधीही घरी आणू नका.
माता लक्ष्मीसह भगवान नारायणाची पूजा करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. असं म्हटलं जात की भगवान विष्णू यांच्याशिवाय महालक्ष्मी कुठेही जात नाही. त्यामुळे भगवान विष्णूसह महालक्ष्मी मातेच्या तसबिरीची पुजा करणे चांगले.