दिवाळीच्या दिवसात चुकूनही ही गिफ्ट देऊ नका
अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आलाय. धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते. सणांमध्ये भेटवस्तू देण्याची परंपरा जुनी आहे. मिठाई, ड्रायफ्रुट्ससारख्या भेटवस्तू दिवाळीच्या दिवसात लोक एकमेकांना देतात.
मुंबई : अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आलाय. धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते. सणांमध्ये भेटवस्तू देण्याची परंपरा जुनी आहे. मिठाई, ड्रायफ्रुट्ससारख्या भेटवस्तू दिवाळीच्या दिवसात लोक एकमेकांना देतात.
असं म्हटलं जात की कोणत्याही व्यक्तीला त्याच्या नशिबात जितकं लिहिलंय तितकंच मिळतं त्याहून अधिक मिळत नाही. मात्र अनेकदा आपण आपल्या प्रियजनांना अशा काहीतरी भेटवस्तू देतो ज्यामुळे धनदेवता लक्ष्मी नाराज होते.
तुम्हीही दिवाळीत कोणाला गिफ्ट देणार असाल तर चुकूनही ही गिफ्ट देऊ नकाल
घरात गणेशाची मूर्ती अथवा महालक्ष्मीची मूर्ती स्वत: आणा. मात्र कोणाला गिफ्ट देऊ नका.
सोने, चांदी, तांबे, कांस्य आणि पितळ या पाच धातूंपासून बनलेले कोणतीही वस्तू गिफ्ट म्हणून देऊ नका.
सिल्क कपडे कोणालाही गिफ्ट करु नका.
ब्लॅक कलरच्या वस्तू कोणालाही गिफ्ट करु नका.