जाणून घ्या एकादशीचे महत्त्व आणि कथा
पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे.
मुंबई : पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे.
एकादशीची कथा
मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील,' असा वर दिला होता. या वरामुळे उन्मत झालेला राक्षसाने देवांवर स्वारी केली. यावेळी सर्व देव मदतीसाठी शंकराकडे धावले. मात्र शंकारांनाही काही करता येत नव्हते. यावेळी देव शंकरासह एका गुहेत जाऊन लपून बसले. यावेळी देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिने मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली. त्या दिवशी पाऊस पडत होता. त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले. तसेच सर्वजन गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला. या देवीचे नाव होते एकादशी
शास्त्रानुसार, जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णुसह देवी एकादशीची मनोभावे पूजा करतो ती व्यक्ती पापमुक्त होते असे म्हटले जाते. तसेच त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होते.
या गोष्टी एकादशीच्या दिवशी करु नयेत.
एकादशीच्या दिवशी रात्री झोपणे, पान खाणे, खोटं बोलणे, जुगार खेळणे या गोष्टी करु नयेत.