मुंबई : तुम्ही पाहिलं असेल की काही मुली या लगेचच रागावतात तर काही प्रेमाणे सगळ्या गोष्टी सांभाळतात. प्रत्येकाचं व्यक्तीमत्व हे वेगवेगळं असतं. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कोण व्यक्ती कशी आहे तर तुम्हाला फक्त त्याचा जन्मदिवस माहिती असणे आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. ज्योतिष शास्त्रानुसार जन्मदिवसावरून  माणसाच्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. ज्या मुलींचा जन्म १.१०,१९ किंवा २८ तारखेला झाला असेल तर त्या मुली समजदार असतात. यांच्यामध्ये घरासोबतंच नोकरी व्यवस्थित सांभाळण्याचं चांगलं कौशल्य असतं. या मुली पतीच्या कामात ही मदत करतात. यांच्यात आत्मसन्मान आणि आत्मगौरव मोठ्या प्रमाणात असतो. 


२. ज्या मुलींचा जन्म २,११, २० किंवा २९ या दिवशी होतो त्या मुली शांत आणि सौम्य स्वभावाच्या असतात. यांना सुंदर दिसायला आवडतं. यांच्यात आकर्षक दिसण्याची तिव्र इच्छा असते. 


३. कोणत्याही महिन्यातील ३,१२, २१ आणि ३० या दिवशी जन्म झालेल्या मुली गोड बोलणाऱ्या आणि परिवारात अधिक महत्त्व दाखवणाऱ्या असतात. या मुली लग्नानंतर पतीवर पूर्णपणे दबाव ठेवतात. या मुली रोमँटीक असतात आणि कला, संगीत याच्यात त्यांना अधिक रूची असते. 


४. ज्या मुलींचा जन्म ४, १३, २२, ३१ या दिवशी होतो त्या मुली बुद्धीशाली आणि अभ्यासात हुशार असतात. या मुलींना घराच्या बाहेर राहणं अधिक आवडतं. या मुली खुल्या विचाराच्या असतात. 


५. ५, १५, २३ या दिवशी जन्म झालेल्या मुली व्यवहारात अधिक कुशल असतात. या मुलींना जीवनात यशस्वी होण्याची तीव्र इच्छा असते. विवाहानंतर या मुली पती आणि मुलांच्या प्रती महत्त्वाची भूमिका बजावतात. 


. ६, १५ आणि २४ या दिवशी जन्म झालेल्या मुली आकर्षक असतात. यांचं हृदय प्रेमाणे भरलेलं असतं. परिवाराला सोबत घेऊन चालण्याचं यांच्याकडे कौशल्य असतं. त्यामुळे या चांगली पत्नी आणि आई बनतात. त्यांच्यात असलेल्या गुण आणि वर्तवणुकीमुळे त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होते. 


. ७, १६ आणि १७ या दिवशी जन्म झालेल्या मुलींना एकटं राहणं अधिक पसंद असतं. यांना असं वाटतं की त्यांच्याकडे सगळ्यांनी ध्यान द्यावं. विवाहानंतर या मुली त्यांच्या पतीकडून अधिक प्रेम अपेक्षित करतात. आर्थिक गोष्टींच्या बाबतीत यांना खूप संघर्ष करावा लागतो. 


८. ज्या मुलींचा जन्म ८, १७ आणि २६ या तारखेला होतो त्या मुली मेहनती असतात. यामुली बुद्धी, प्रयत्नांच्या बळावर जीवनात पुढे जाण्याची इच्छा बाळगतात. या मुली चांगला सल्ला देऊ शकतात. या मुली परिवाराला खूप चांगल्याप्रकारे सांभाळतात. 


९. ९, १८, २७ या दिवशी जन्म झालेल्या मुली खुल्या विचारांच्या असतात. या मुली स्वत:च्या मनाला वाटतं तेच करतात. या खूप रागवणाऱ्या असतात. या मुली रोमँटीक आणि जगासोबत पुढ़े जाण्याचा विचार करतात.