जन्मतारखेवरुन जाणून घ्या तुमचा शुभअंक
अंकशास्त्रात प्रत्येक अंकाला वेगळे महत्व असते. प्रत्येक व्यक्तींचा जन्मतारखेनुसार विशिष्ट शुभअंक असतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख २० फेब्रुवारी १९७२ असल्यास 20-2-1972 म्हणजेच 2+0+2+1+9+7+2=23=2+3=5 हा त्या व्यक्तीचा शुभअंक आहे.
मुंबई : अंकशास्त्रात प्रत्येक अंकाला वेगळे महत्व असते. प्रत्येक व्यक्तींचा जन्मतारखेनुसार विशिष्ट शुभअंक असतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख २० फेब्रुवारी १९७२ असल्यास 20-2-1972 म्हणजेच 2+0+2+1+9+7+2=23=2+3=5 हा त्या व्यक्तीचा शुभअंक आहे.
१. ज्यांचा शुभअंक १ असतो अशा व्यक्ती आत्मविश्वासू आणि साहसी असतात. कमी संवेदनशील असतात. अशा व्यक्ती पटकन चिडतात. मनमौजी स्वभावाच्या या व्यक्ती असतात. तसेच यांचे अनेक शौक असतात. त्यांना भडक रंग आवडतात.
२. २ अंक असलेले लोक कमी बोलणारे असतात. यांची कल्पनाशक्ती चांगली असते. हे सौंदर्याचे उपासक असतात. यांचे गृहस्थ जीवन तणावपूर्ण आण चढ-उताराचे असते. यांचा शुभरंग आहे सफेद.
३. या व्यक्ती जिद्दी असतात. जी गोष्ट ठरवतात ती गोष्ट पूर्ण करतातच. नेहमी प्रयत्नशील असतात. दुसऱ्यांवर प्रभुत्व ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. यांचा शुभरंग असतो पिवळा आणि गुलाबी असतो.
४. यांचे जीवन सतत संघर्षमय असे असते. या व्यक्ती अस्थिर आणि चंचल असतात. स्वत:चेच खरे करण्याची यांना सवय असते. यामुळे अनेकदा शत्रुत्व निर्माण करतात. यांचा शुभ रंग हिरवा आहे.
५. अशा व्यक्तींना व्यवसायात यश मिळते. यांना फिरण्याची आवड असते. अशा व्यक्ती साहसी आणि सक्रिय असतात. विनोदी स्वभावाच्या अशा या व्यक्ती असतात. यांचा शुभ रंग हिरवा आहे.
६. ज्यांचा शुभअंक ६ आहे अशा व्यक्ती बोलण्यात पटाईत असतात. यांचा स्वभाव मोहक असतो. विनोदी आणि निखळ स्वभावाच्या असतात. दृढनिश्चयी असतात. यांचा शुभ रंग आहे सफेद अथवा गुलाबी.
७. या व्यक्ती स्पष्टवक्त्या आणि चिंतनशील असतात. यांचे समाजात विशिष्ट स्थान असते. हे आपल्या तत्वाने जीवन जगतात. यांच्या विचारांमध्ये परिपक्वता आढळते.
८. शुभअंक ८ असलेल्या व्यक्ती गंभीर तसेच अंतर्मुख असतात. मैत्री करतानाही विचारपूर्वक करतात. त्यामुळे यांचा मित्र परिवार लहान असतो. या व्यक्ती विश्वासू तसेच प्रामाणिक असतात. यांचा शुभरंग आहे मोरपंखी.
९. या व्यक्तींना राग पटकन येतो. प्रभावशाली असतात. तसेच साहस, दृढनिश्चयी आणि स्वच्छंद प्रवृत्तीचे असे असतात. रागीट स्वभावामुळे अनेकदा अडचणीत येतात.