अक्षय तृतीयेसाठी शुभ मुहूर्त
यंदाच्या वर्षी अक्षय तृतीया दोन दिवसांची असल्याचे सांगितले जातेय. त्यामुळेच अक्षय तृतीया नेमकी कधी साजरी करावी याबाबत लोक संभ्रमात आहेत.
नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी अक्षय तृतीया दोन दिवसांची असल्याचे सांगितले जातेय. त्यामुळेच अक्षय तृतीया नेमकी कधी साजरी करावी याबाबत लोक संभ्रमात आहेत.
ज्योतिषाचार्यांच्या मते अक्षय तृतीया २८ एप्रिलला सकाळी १०.२९ मिनिटांनी सुरु होईल आणि २९ एप्रिल सकाळी ६.४९ मिनिटाला संपेल. २८ एप्रिलला संपूर्ण दिवस अक्षय तृतीया साजरी केली जाऊ शकते. या दिवशी १.३९ मिनिटांनी रोहिणी नक्षत्र सुरु होतेय. या नक्षत्रात खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे २८ एप्रिलला अक्षय तृतीया साजरी करावी.
या दिवशी लक्ष्मीमाता आणि भगवान विष्णूची यथासांग पूजा करावी. यामुळे घरात सुख-समृद्धी कायम राहते.