दुसऱ्यांच्या या वस्तू कधीही वापरु नका
प्रत्येक मनुष्याची स्वत:ची एनर्जी असते ज्याचा प्रभाव आसपासच्या व्यक्तींवर तसेच आपण जर दुसऱ्यांच्या वस्तू वापरत असू तर त्यावर पडत असतो. अशात दुसऱ्यांच्या वस्तू आपल्यासाठी नुकसानकारक ठरु शकतात. यामुळे दुसऱ्यांच्या या ६ वस्तू कधीही वापरु नका.
मुंबई : प्रत्येक मनुष्याची स्वत:ची एनर्जी असते ज्याचा प्रभाव आसपासच्या व्यक्तींवर तसेच आपण जर दुसऱ्यांच्या वस्तू वापरत असू तर त्यावर पडत असतो. अशात दुसऱ्यांच्या वस्तू आपल्यासाठी नुकसानकारक ठरु शकतात. यामुळे दुसऱ्यांच्या या ६ वस्तू कधीही वापरु नका.
जाणून घ्या या ६ गोष्टी
पेन - अनेकदा आपण दुसऱ्याचे एखादे पेन घेतो. मात्र काम संपल्यानंतर ते परत करायला विसरतो. यामुळे आपल्याला आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे चुकूनही कोणाचे पेन आपल्याकडे ठेवू नका.
बेड - बाहेर गेल्यास इतर कोणाच्याही बेडवर झोपू नका. यामुळे धनसंबंधित समस्या उद्भवू शकतात.
घड्याळ - हातात घातले जाणारे घड्याळातून नेहमी चांगली-वाईट उर्जा बाहेर निघत असते. दुसऱ्यांचे घड्याळ घातल्यास त्या मनुष्यांच्या कामांमध्ये असफलता मिळू शकते.
कपडे - दुसऱ्यांचे कपडे कधीही वापरु नका. यामुळे आर्थिक समस्या उद्भवू शकतात.
धन - दुसऱ्यांचे धन कधीही वापरु नका. कोणाकडून उधार घेतल्यास ते ताबडतोब परत करु नका.
रुमाल - एखाद्या व्यक्तीचा रुमाल वापरल्यास त्या व्यक्ती आणि तुमच्यात कदाचित भांडण होऊ शकते. तसेच दुसऱ्यांचा रुमाल वापरणाऱ्यास सतत पैशाचे नुकसान सहन करावे लागू शकते.