नोटा बंदीनंतर... या महिन्याचे व्हायरल होणारे राशी भविष्य...
मोदी सरकारने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस पडला. असा गंमत करणारे एक राशी भविष्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : मोदी सरकारने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस पडला. असा गंमत करणारे एक राशी भविष्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा तुमची रास कनची... हा महीना असा जाईल
मेष :- प्रयत्नास कर्मचाऱ्यांचे लाभलेले पाठबळ आपणास बँकमध्ये ५०० रु चे नोट बदलण्यास मदत करतील. नविन नोट ५ दिवस जपून वापरावे, अध्यात्मिक आवड असणाऱ्यांनी ३ दिवस १००० रु चे नोट बँकमध्ये जमा करु नये. नविन १०००रु चे नोट येण्याची शक्यता.
वृषभ :- नोट बदलण्यासाठी रांगेत उभे राहण्याच्या युक्तीचा अचुक वापर करावा. वैयक्तिक संबंध असणाऱ्या व्यक्तीला आपल्या समोर रांगेत उभे करु नये, त्यामुळे तुम्हाला १०० रु चे जुने नोट मिळण्याची शक्यता.
मिथुन :- बँकमध्ये २००० रु चे नविन नोट मिळत असले तरी ते तुम्हाला मिळेल अशी आशा मनात बाळगू नये. ५०० रु नविन नोट वर समाधान मानावे लागेल.
कर्क :- आर्थिक बाजू बळकट असल्यामुळे १०० रु चे नोट आत्मविश्वास वाढवेल. मित्रांकडून ५०० रु चे सुट्टे मिळेल या भ्रमात राहू नये, १०० रु चे जास्त असल्यामुळे कुटूंबात मानाचे स्थान मिळेल.
सिंह :- ५०० रु व १००० चे बंद झाल्यामूळे स्वतः जवळचे ५०० रु चे नोट आप्तांना बदलण्यास सांगू नये. १००० रु चे नोट (बँकमध्ये खाते नसल्यास) बदलवून देणाऱ्याचे फक्त चाय देऊन समाधान करा.
कन्या :- ५०० रु व १००० रु नोट बदलण्यासाठी बँकेत जावे लागेल, परंतू हे नोट स्वतःचे नाहीत याची जाणीव ठेवावी. मित्रांसोबत बँकेत जाणे टाळावे. ५०- १०० रु चे नोट जपून वापरा.
तुळ :- संघर्षाचा परंतू नोट बदलवून देणारा हा महिना आहे. बँकमध्ये ५०० व १००० रु चे नोट पेलण्यात मोठा हातभार राहील.
वृश्चिक :- बँकमध्ये रागेत शांतपणे उभे राहावे. रांगेतून बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त करु नये, असे केल्यास १० रु ची गड्डी सुद्धा हाताला लागणार नाही.
धनु :- या महिन्याच्या पूर्वार्धात १०० रु चे नोट साठी खुप तडजोड करावी लागेल. मित्रांच्या प्रेमळ बोलण्यामुळे ५०० रु चे सुट्टे देवू नका. २००० रु ची नोट मिळण्याची शक्यता.
मकर :- तुम्ही मिळवीलेल्या १० रु चे नोट मुळे परीवारात खुप नावलौकिक होईल. सतत सन्मान होण्यासाठी यापूढे १०० रु चे नोट खिशात ठेवावे. नविन नोट साठी बँकेत जाणे गरजेचे राहील.
कुंभ :- दैनंदिन व्यवहाराच्या गरजेसाठी बँकेतून २००० रु चे मिळवणे गरजेचे राहील. डाकघर मध्ये फक्त ५०० रु चे नोट बदलावे. खिशात चार दिवस १० रु चिल्लर ठेवणे गरजेचे राहील.
मीन :- या महिन्यात तुम्हाला 'जपुन वाट चिल्लर जरा' असा सल्ला देत आहे. सुट्टे नसल्याने कौटूंबिक त्रास सहन करावा लागेल. परीवारातून फक्त ५०० रु चे नोट मिळतील.