झी मीडिया ब्युरो : पंडू राजूची कुलवधू द्रौपदी हिचं भर सभेत वस्रहरण करण्याचा प्रयत्न कौरवांनी केला... हे तर अनेकांना माहीत आहे. पण, याच कौरवांना भरसभेत पांडवांनी नाही तर कौरवापैंकीच एकानं विरोध केला होता, हे तुम्हाला माहीत आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द्युतमध्ये पराभव झाल्यानंतर दुर्योधन आणि दुशासनानं द्रौपदीच्या केसांना हात घालत तिला भर सभेत खेचून आणलं... द्रौपदीला निर्वस्र करण्याचा आदेश देण्यात आलाय. या सभेत पांडवांसोबतच भीष्म द्रोणाचार्य, गुरु द्रोणाचार्य, दानवीर कर्ण यांच्यासारखे महारथीही उपस्थित होते. पण, कुणीही याला विरोध करण्याचं धाडस दाखवलं नाही.


केवळ या कौरवानं केला विरोध


पण, याला विरोध केला तो एकाच व्यक्तीनं... हा व्यक्ती म्हणजेच कौरवांपैकी एक असलेल्या विकर्णनं... घरातील सूनेचा असा अपमान करणं म्हणजे सर्वनाश असल्याची जाणीव विकर्णनं करून दिली होती. 


यावेळी, विकर्णनं पांडवांना आपल्या पत्नीला खेळात दावावर लावण्यावर फैलावर घेतलं... परंतु, उलट विकर्णला कर्णानं अपशब्द उच्चारत गप्प बसून राहण्यास सांगितलं. जेव्हा मोठे उपस्थित आहेत तेव्हा लहानांनी तोंड उघडू नये, असं सांगत कर्णानं त्याला गप्प राहण्यास भाग पाडलं. 


शूर विकर्णचा मूत्यू


विकर्णाचा मृत्यूही मोठ्या विरतापूर्वक झाला. महाभारताच्या युद्धात कौरवांनी जेव्हा निशस्त्र अभिमन्यूला चक्रव्युहात पकडून ठार केलं तेव्हा अर्जुनानं जयंद्रथाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळ न पाहू देण्याची प्रतिज्ञा केली होती. दुपारपर्यंत अर्जुनाला यात यश मिळालं नाही तेव्हा भीमानं अर्जुनासाठी रस्ता बनवण्यासाठी कौरवांना मारायला आणि रस्त्यातून बाजुला करायला सुरूवात केली.


यावेळी, दुर्योधनानं विकर्णाला आपल्या भावांचं रक्षण करण्याचा आदेश दिला. यामुळे, विकर्ण भीमासमोर उभा ठाकला. तेव्हा भीमानं विकर्णाला 'द्युतात तू सहभागी नव्हतास... इथून निघून जा' असं सांगितलं. पणं, विकर्णानं 'मला माझा पक्ष अधर्मी आहे हे माहीत आहे... पण मला माझा भ्राताधर्म पार पाडायचाय. तू युद्ध कर' असं सांगत युद्धाला सज्ज झाला.


या युद्धात भीमाच्या हातून विकर्णला वीरगती प्राप्त झाली.