माउंट अबू : आतापर्यंत अनेक देवदेवतांच्या कथांमध्ये भगवान शंकराचा महिमा सांगण्यात आलाय. मात्र तुम्हाला हे माहित आहे का भारतात असेही एक मंदिर आहे ज्यातील शिवलिंगाचा रंग दिवसांतून तीन वेळा बदलतो. तुम्ही याला निसर्गाचा चमत्कारही म्हणू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान जिल्ह्यातील माउंट अबू येथे हे शिवलिंग आहे ज्याचा दिवसातून तीन वेळा रंग बदलतो. हे शिवलिंग अचलेश्वर महादेव मंदिरात आहे. हे मंदिर २५०० वर्षे जुने आहे. अचलेश्वर महादेव मंदिर माउंट अबूपासून ११ किमी अंतरावर उत्तर दिशेला अचलगड किल्ल्याजवळ आहे. 


या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे या शिवलिंगाचा रंग दिवसातून तीन वेळा बदलतो. सकाळच्या वेळी या शिवलिंगाचा रंग लाल असतो. त्यानंतर दुपारच्या वेळेस हा रंग बदलून केशरी होतो. संध्याकाळी शिवलिंगाचा रंग गव्हाळ होतो. हे मंदिर २५०० वर्षांपूर्वीचे आहे.