मुंबई : महाभारतात युधिष्ठिरने श्रीकृष्णाला विचारले होते की घरात सुख-समृद्धी कायम राखण्यासाठी कोणत्या गोष्टींवर ध्यान द्यावे. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या ज्या घरात नेहमी ठेवल्या पाहिजेत. जाणून घ्या या गोष्टी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंदन- चंदनाला अधिक पवित्र मानले जाते. याच्या सुगंधामुळे नकारात्मक उर्जा नाहीशी होते. देव-देवतांच्या पुजेसाठी चंदनाचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे घरात नेहमी चंदन ठेवावे. 


वीणा- वीणा हे देवी सरस्वतीचे प्रिय वाद्य आहे. वीणा घरात असल्यास सरस्वतीची कृपा घरातील सदस्यांवर राहते. कठिण परिस्थितीलाही धैर्याने तोंड देण्याची शक्ती मिळते. 


तूप - घरात नेहमी तूप असायला हवे आणि नियमितपणे याचे सेवन करायला हवे. तुपामुळे शरीर स्वस्थ राहते. घरात दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा. पुजेमध्ये तुपाचे महत्त्व वेगळे आहे. 


मध - वास्तुशास्त्रानुसार घरात मध ठेवल्याने अनेक दोष दूर होतात. तसेच पुजेमध्येही मधाचा वापर होतो. 


पाणी - घरात नेहमी स्वच्छ पाणी भरुन ठेवावे. जेव्हा कोणी पाहुणे घरी येतात तेव्हा त्यांना सर्वात आधी पिण्यासाठी पाणी द्यावे.