मुंबई : जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा मनात एक भिती असतेच की आपला प्रेमभंग होऊ नये. त्यामुळे एखाद्यासमोर प्रेम व्यक्त करण्याआधी त्याचा हार्ट नंबर जाणून घ्या. त्यामुळे प्रेमभंग होण्याची शक्यता कमी असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकशास्त्रानुसार ज्यांचा हार्टनंबर तीन असतो अशा व्यक्ती प्रेमाबाबत सजग असतात. त्या व्यक्ती रोमँण्टिक असतात. अशा व्यक्ती ज्यांच्यावर प्रेम करतात त्या समोरच्या व्यक्तीकडूनही समान प्रेमाची अपेक्षा करतात. य


लेखन तसेच कलात्मक गोष्टींमध्ये रस


या व्यक्तींना लिखाण तसेच कलात्मक गोष्टींमध्ये रस आवडतो. या व्यक्ती खूप भावुक असतात. यांचे दाम्पत्य जीवन सुखी असते. 


कसा जाणून घ्याल हार्ट नंबर


व्यक्तिच्या नावात जितके ए, ई, आई, ओ, यू हे लेटर असतील त्यांना एकत्र जोडा. उदाहरणार्थ एखाद्याचे नाव मोहन असल्यास इंग्रजीमध्ये हा शब्द MOHAN असा लिहिला जातो. यात एकदा ए हे अक्षर आलंय आणि एकदा ओ हे अक्षर. ए अक्षरासाठी १ अंक आणि ओचा अंक १५. यांची बेरीज केल्यास येते १६. अंकज्योतिषमध्ये ९ पर्यंत अंकाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे १+६ यांची बेरीज होते ७. म्हणजेच मोहन या नावाच्या व्यक्तीचा हार्ट नंबर ७.