मुंबई : आज मकर संक्रांत.. सकाळी सात वाजून 38 मिनिटांनी सुर्याने मकर राशीत प्रवेश केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मकर संक्रांतीला तीळ-गूळ देण्याची प्रथा आहे. मकर संक्रांत ही थंडीमध्ये येत असते. थंडीमध्ये तीळ हे आरोग्यासाठी उपयुक्त असतात. थंडीमध्ये आपल्या कोरड्या त्वचेला जर तीळाचं तेल लावलं तर त्वचा तेजस्वी होते. 


वर्षभरात आपले कुणाशी मतभेद किंवा भांडणे झाली असतील तर मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तीळगूळ देऊन बिघडलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्नही केला जाऊ शकतो. 


मकर संक्रांतीपासून दिनमान वाढत जाते. मकर संक्रांतीविषयी काही गैरसमजही आहेत. तसच पौष महिना हा वाईट किंवा अशुभ नसतो. पौष महिन्यांत विवाह मुहूर्तही दिलेले असतात...