मुंबई : जमिनीत लपवलेले छुपे धन मिळवण्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. पण, या लोकांना लपवलेले धन सापडते तरी कसे? कोणत्या आधारावर ते या धनाचा शोध घेतात? रावण संहितेत हे छुपे धन शोधण्याचे उपाय सांगितले आहेत. त्यातील काही संकेतांच्या आधारे आपण हे छुपे धन शोधू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रावण संहितेनुसार जिथे मोठ्या प्रमाणावर सोने - चांदी लपवलेली असते तिथे आसपास सफेद नाग फिरत असतो. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साप पुन्हा पुन्हा दिसू लागतात त्या ठिकाणी धन लपवलेले असल्याची शक्यता असते. या छुप्या खजान्यात साप वास्तव्यासही येत असतात.


वर्षानुवर्षे पडीक असलेल्या घरांमध्ये अशाप्रकारचे छुपे धन मिळण्याची दाट शक्यता असते. पूर्वीच्या काळी लोकांकडे धन लपवण्यासाठी बँक नव्हत्या. तेव्हा जमिनीत हे धन गाडून ठेवण्याची पद्धत असे.


रावण संहितेनुसारच तुमच्या स्वप्नात तुम्हाला इंद्रधनुष्यासोबत कमळाचे फूल दिसले तर तो एक शुभसंकेत आहे. कारण या स्वप्नानंतर तुम्हाला ४५ दिवसांत छुपे धन मिळण्याची दाट शक्यता असते.


तुमच्या स्वप्नात जर कमळाच्या पानावर तुम्ही स्वतःलाच भोजन करताना पाहिले तर येणाऱ्या काही दिवसांत तुम्हाला हा धनलाभ होण्याची शक्यता असते. स्वप्नात कमळ, शंख आणि सोने चांदी दिसल्यास लपवलेले धन जरुर सापडू शकते.