मुंबई : आपल्या प्रत्येकाच्या घरात झाडू असतेच. केवळ केर काढणे इतकाच या झाडूमागील उद्देश नसतो, तर भारतात झाडूसंबंधी वेगवेगळे समज-गैरसमज आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) काही समजांनुसार सूर्यास्तानंतर घरात केर काढू नये. यामुळे घरात आर्थिक संकट येऊ शकते. उत्तर भारतात काही ठिकाणी असा समज आहे की झाडू नेहमी आडवी ठेवावी. कारण, ती उभी ठेवल्यास घरात कलह होण्याची शक्यता असते. 


२) जे लोक भाड्याच्या घरात राहातात किंवा त्यांनी नवीन घरात प्रवेश करतात, तेव्हा जुन्या घरातील झाडू नवीन घरात न्यावी. ती जर जुन्या घरात ठेवली तर तुमची लक्ष्मी जुन्याच घरात राहाते आणि नव्या घरात तुमची होणारी आर्थिक प्रगती खुंटते. 


३) ज्याप्रमाणे धन इतरांपासून लपवले जाते त्याप्रमाणे घरातील झाडूसुद्धा इतरांपासून लपवून ठेवण्याचा समजही काही प्रदेशांत आहे. लोकांच्या नजरेमुळे घरात येणाऱ्या आणि घरातून जाणाऱ्या धनावर त्याचा परिणाम होतो. 


४) घरातील लक्ष्मीला ज्याप्रमाणे आदर देतात त्याप्रमाणे घरातील झाडूचाही आदर करण्याची परंपरा आहे. याचा अर्थ झाडूची दररोज पूजा करा असा होत नाही. तर, केवळ झाडूला पाय लावू नये असा आहे. घरातील केर काढल्यावर झाडूला सन्मानपूर्वक तिच्या जागेवर ठेवून द्यावी.