कितव्या वर्षी तुम्ही बनणार धनवान?
प्रत्येकाच्या मनात श्रीमंत होण्याची एक सुप्त इच्छा दडलेली असते. यासाठी अनेकजण आपलं भाग्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला हात दाखवतात. मात्र आता तुम्ही ज्योतिषाला हात न दाखवताही तुमच्या हातात धनयोग कधी आहे हे जाणून घेऊ शकता.
मुंबई : प्रत्येकाच्या मनात श्रीमंत होण्याची एक सुप्त इच्छा दडलेली असते. यासाठी अनेकजण आपलं भाग्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला हात दाखवतात. मात्र आता तुम्ही ज्योतिषाला हात न दाखवताही तुमच्या हातात धनयोग कधी आहे हे जाणून घेऊ शकता.
प्रत्येकाच्या हातात धनरेषा वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाच्या हातात एकाच स्थानावरुव धनरेषा सुरु होत नाही. भाग्य आणि हृद्य रेषेला छेदून जाणारी रेषा धनरेषा मानली जाते.
असं म्हणतात की पुरुषांचा डावा हात पाहिला जातो तर महिलांचा उजवा हात पाहतात. मात्र असे काही नसते. तुम्ही ज्या हाताने तुमची सर्व कामे करता तो हात पाहिला जातो. तुम्ही सगळी कामे उजव्या हाताने करता तर उजवा हात पाहतात.
या वयात सुरु होते धन आगमन
जर तुमच्या हातात जीवन रेषा, भाग्य रेषा आणि मस्तिष्क रेषा मिळून M हे अक्षर तयार होते तर 35 ते 55 वयात आपण खूप धनसंपत्ती मिळवाल असे संकेत असतात. याचा अर्थ तुम्ही लग्नानंतर खूप धन कमवाल.