मुंबई : प्रत्येकाच्या जीवनात रंगाचं विशेष महत्त्व आहे. वेगवेगळ्या राशीच्या लोकांसाठी वेगवेगळे रंग हे शुभ असतात तर काही रंग हे अशुभ मानले जातात. तुमच्या पार्टनरच्या संबंधित देखील असंच काही आहे. तुमच्या पार्टनरला देखील तुम्ही कोणता रंग लावला पाहिजे आणि शरिराच्या कोणत्या अंगाला रंग लावला पाहिजे हे देखील तुमच्या राशीनुसार महत्त्वाचं आहे.


मेष :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी पिवळा रंग पार्टनरच्या गालावर लावावा. तर महिलांनी लाल आणि पिवळा रंगाचा वापर करावा. यामुळे दोघांच्या जीवनात सकारात्मकता आणि प्रेम तयार होईल. 


वृषभ :


या राशीच्या लोकांनी सफेद कपडे परिधान करुन नारंगी आणि वांगी रंगाने होळी खेळावी. पार्टनरला नारंगी रंगाचा टीळा लावावा आणि पायावर वांगी रंग टाकावा यामुळे पार्टनर आणि तुमच्यामधली नकारात्मकता आणखी दूर होईल.


मिथुन :


मिथुन राशीच्या व्यक्तींनी हिरवा रंगाचा टीळा पार्टनरच्या कपाळी लावावा. यामुळे तुमच्या जीवनात आनंद-आनंद येईल.


कर्क :


कर्क राशीच्या व्यक्तींनी सफेद कपडे परिधान करुन होळी खेळावी आणि पार्टनरच्या पाठीवर पिवळा रंग लावून होळी खेळावी. यामुळे तुमच्या जीवनातील दुख: दुर होतील. 


सिंह :


सिंह राशीच्या व्यक्तींनी बेंबीला पिवळा, लाल किंवा नारंगी रंग लावून होळी खेळावी. यामुळे तुमच्या पार्टनर तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही.


कन्या :


मानेच्या खाली हिरवा रंग लावून कन्या राशीच्या लोकांनी होळी खेळावी. यामुळे तुमचे संबंध अजून घट्ट होतील. वांगी रंग देखील महिलांसाठी शुभ आहे.


तुळ :


या राशीच्या व्यक्तींनी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करुन निळा, केसरी रंग तुमच्या पार्टनरच्या मनगटाला लावून होळी खेळावी. यामुळे तुमच्या दोघांमधलं प्रेम आणखी घट्ट होईल.


वृश्चिक :


लाल, मरुन किंवा पिवळा रंग हा या राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. पार्टनरच्या कंबरेला रंग लावल्याने तुमचे संबंध आणखी मजबूत होतील आणि तुमच्यामध्ये जवळीकता वाढेल.


धनु :


या राशीच्या लोकांना पार्टनरला आधी अलिंगन देऊन रंग लावावा. लाल आणि पिवळा रंग हा तुमच्यासाठी शुभ आहे.


मकर :


कर राशीच्या व्यक्तींनी लाल रंग कंबरेला लावून होळी खेळण्यास सुरुवात करावी. या राशीच्या व्यक्तींनी निळा आणि काळा रंग घेऊन होळी खेळावी. 


कुंभ :


कुंभ राशीच्या व्यक्तींनी वांगी आणि लाल रंगाने होळी खेळावी. या राशीच्या व्यक्तींना पार्टनरच्या हाताला रंग लावावा.


मीन :


मीन राशीच्या व्यक्तींनी पार्टनरच्या कपाळाला पिवळा रंगाचा टीळा लावावा. गुलाबी रंगाने होळी खेळणे शुभ आहे.