मुंबई : पद्यपुराणानुसार एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अवतारांची पूजा केली जाते. या दिवशी मनोभावे पुजा केल्यास मोक्षप्राप्ती होते. तसेच यहजारो यज्ञ केल्याने जितके पुण्य मिळते तितके पुण्य या दिवशी दान केल्याने मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवशी सात्विक आहार घेतला जातो. लसूण, कांदा, मास-मटण, अंडी वर्ज्य असते. तसेच तांदळापासून बनवलेले पदार्थही या दिवशी वर्ज्य असतात.


आपण आधीपासून ऐकत आलोय की एकादशीच्या दिवशी तांदळाचे तसेच त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केले जात नाही. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का?...


शास्त्रात तांदळाचा संबंध जलाशी लावण्यात आला आहे आणि जलाचा संबंध चंद्राशी. पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांच्यावर मनाचा अधिकार असतो. मन आणि सफेद रंगाचा स्वामी चंद्र आहे. 


एकादशीच्या दिवशी शरीरात जलाची मात्रा जितकी कमी असले तितके व्रत सात्विक मानले जाते. तांदळात पाण्याची मात्रा अधिक असते. जलावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे भात खाल्ल्याने शरीरात पाण्याची मात्रा वाढते. यामुळे मन अधिक विचलित अथवा चंचल होते. यामुळे व्रतामध्ये अडथळे येण्याची भिती असते. एकादशीचे व्रत करताना मन निग्रही असणे आणि सात्विक भाव असणे गरजेचे असते. म्हणून एकादशीच्या दिवशी भात खात नाहीत.