मुंबई : भगवान शंकराच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे यावर्षी महाशिवरात्र सोमवारी येत आहे. महाशिवरात्री सोमवारी येण्याचा योग यापुढे पुन्हा १२ वर्षांनी येणार आहे. त्यामुळे यंदाची महाशिवरात्र शिवभक्तांसाठी खास ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाशिवरात्र खास असण्याची ही कारणे?


- यंदाची महाशिवरात्र सोमवार दिनांक ७ मार्चला दुपारी १.२० वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३३ मिनिटांपर्यंत असेल.
- यंदाची महाशिवरात्र विशेष असेल कारण यंदा भगवान शंकरांच्या सोमवारी त्रयोदशी आणि चतुर्दशी अशा दोन्ही तिथी येणार आहेत.
- याच दिवशी शुभ योग तसेच पंचग्रह, ग्रहण तसेच कालसर्प योगही येणार असल्याने ग्रहशांतीचा लाभही मिळणार आहे.
- भगवान शंकर हे तंत्राचे महादेव आहेत. म्हणून तंत्राच्या चार रात्रींपैकी एक रात्र महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. यंदा मार्च महिन्यात ही रात्र महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाणार आहे.
- तंत्रांमध्ये अशा अनेक साधना असतात ज्या केवळ रात्रीच्या वेळेसच केल्या जातात. ही साधना करणे हे इतर अनेक साधना करण्यापेक्षा कित्येक पटीने लाभदायी आणि फलदायी असते.
- याच दिवशी शिवज्योती प्रकट झाली होती आणि शिव पार्वती यांचा विवाहसुद्धा झाला होता.


असा योग फलदायी!


यापूर्वी २०१२ मध्ये महाशिवरात्रीचा योग सोमवारी आला होता. आता पुन्हा चार वर्षांनी तो आला आहे. यापुढे २०२८ साली महाशिवरात्री सोमवारी येणार आहे. सोमवारी येणाऱ्या महाशिवरात्रीचा योग फलदायी असतो. याचे कारण चंद्र, राहू आणि केतू हे ज्यांच्यासाठी वाईट स्थानात आहेत त्यांच्यासाठी भगवान शंकरांची आराधना फलदायी असणार आहे.