मुंबई : आपल्या कपाळावर जे काही लिहिलं असेल ते आपल्या जीवनात घडतं असं म्हटलं जात. मात्र कपाळाच्या आकारावरुन समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे असेल हेही तुम्ही जाणून घेऊ शकता.


मोठे कपाळ - अशा व्यक्ती बुद्धिमान असतात. जीवनाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन असतो. सर्वांशी विनम्रतेने वागतात. 


 


अरुंद कपाळ - स्वत:च्या लाईफबद्दल यांनी काही नियम बनवलेले असतात. त्यानुसारच ते जगतात. त्यामुळे लोक काय बोलतात याचा या लोकांना विशेष फरक पडत नाही.


 


सरळ कपाळ - मेहनतीवर या लोकांचा पूर्ण विश्वास असतो. वेळ मूल्यवान असते त्यामुळे वेळेचा जितका चांगल्या कामासाठी जास्तीत जास्त वापर करता येईल याकडे प्राधान्य देतात. 


 


गोल कपाळ - या व्यक्ती संवेदनशील असतात. कोणताही निर्णय घेताना संवेदनशीलतेने घेतात.


 


एम आकाराचे कपाळ - या व्यक्ती क्रिएटिव्ह असतात. तसेच यांना अनेक कलागुण अवगत असतात. यांचा मित्रपरिवारही मोठा असतो.


 


डोंगराच्या आकाराचे कपाळ - या व्यक्ती सुशील आणि शांत स्वभावाच्या असतात. समोरच्या व्यक्तीसाठी त्या एखाद्या गोष्टीचा त्याग करण्यासही तयार होतात. 


 


रेखीव कपाळ - इतरांपेक्षा स्वत:वर यांचे अधिक प्रेम असते. या व्यक्ती निस्वार्थी असतात.