कस्तुरी कुलकर्णी 


कस्तुरी कुलकर्णी 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळी पहाट !!
 काय मस्त वाटत न !!
 आणि त्यात ही दिवाळी सुरमयी असेल तर,अधिकच आनंददायी वाटतं सगळं...
 आज माझंही तसंच झालं ,उल्हासित मनाचा आनंद अधिकच द्विगुणित झाला,कारण सुरमयी मेजवानीचा आस्वाद अनुभवला सुप्रसिद्ध गायक " महेश काळे " यांच्या सुरेल गाण्यासोबत!!!
 शंखनाद ! तबल्यावरची पहिली थाप ! पखवाजची झंकार ! संवादिनीची जादुई धून ! साइड रिदम देणाऱ्या सगळ्याच वाद्यांचा मधूर निनाद आणि सोबत "महेश काळे "जींचे आल्हाददायक स्वर ....!!
 व्वा !! क्या बात !!
 मनातल गाणं प्रत्यक्षात उतरवण्याचे बळ आहे त्यांच्या गायकीत ... 
 "नमामि गजानन'चा त्यांचा पहिला हुंकार तर गजाननाच्या गभाऱ्यातच असल्याचा अनुभव देऊन गेला... आणि पुढच्याच् क्षणी सूर निरागस हो गाण्याची निरागसता अलगद पापण्याच ओलावून गेली... ही त्यांच्या सुरावटीचीच ताकद म्हणता येईल, है ना!!
 आणि ही निरागसता फक्त गाण्यातच नव्हती, तर त्यांच्या आचरणातून ही ती जाणवली, कारण कार्यक्रमसाठी आलेले असंख्य श्रोते सभागृहात उभ्यानेच गाणे ऐकत असताना महेशजींनी सगळ्या उभ्या असलेल्या श्रोत्यांना व्यासपीठावरच बसवून घेतले अगदी त्यांच्या जवळच !!! असा दिलखुलास कलाकार क्वचितच म्हणावा लागेल..


 "भर पंखातून स्वप्न उद्याचे, 
 झेप घे रे पाखरा , मनमंदिरा ."....असं गात असताना तर खरंच पंख भरारी घेत असल्याचा आभास झाला ...आपणही काहीतरी आशा मनी बाळगली पाहिजे असं वाटून गेलं अगदी ...आपल्या गाण्यातून निखळ संवादच साधला त्यांनी सर्वांशी...
 
 " काटा रूते कुणाला " या गाण्याची फरमाइश पूर्ण करताना तर ते म्हणाले की ही तर,, "त्यांच्या वडिलांच्या वयाची गाणी आहेत ,त्यामुळे अशी गाणी गाताना वडिलांचे मित्रच भेटल्याच जाणवत मला " आणि म्हणूनच मलाही त्यावेळी " माझे बाबा " भेटल्या सारखच झाल .....सूर निरागस ऐकत असताना तर बाबा समोरच आहेत अस वाटल... बाबा really I miss u so much today ...बाबा नेहमी म्हणायचे की कलाकाराला त्याच्या कलेत ' वेडं होता आलं पाहिजे, जे आज मी महेश काळे यांच्या गाण्यातून खऱ्या अर्थाने अनुभवल...



 


 मैफिलीची सांगता तर सगळया सभागृहाने "मनमंदिरा " हे गाणं महेशजींसोबत गाऊन केली, त्यामुळे सगळ्यांचीच ओंजळ सूर-सुमनांनी नक्कीच भरली असणार, यात शंकाच नाही.
 त्यामुळे महेश जी तुमचे खूप खूप धन्यवाद !! आणि आपले आयोजक नीलेश राउत यांचेही खूप आभार की तुम्ही ही मैफल आयोजित केली...आणि आपणास पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !!