पिंपरी चिंचवडची सून होणार प्रियांका गांधी...!
पिंपरी चिंचवडकरांची सून होणार आहे प्रियांका गांधी...! ऐकूण धक्का बसला ना...! पण हे खरे आहे...! सध्या शहरात खास करून भाजप सरचिटणीस आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे विश्वासू लॅपटॉप मॅन सारंग कामतेकर यांच्या गोटात तर यावर बरीच चर्चा सुरु आहे....!
कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडकरांची सून होणार आहे प्रियांका गांधी...! ऐकूण धक्का बसला ना...! पण हे खरे आहे...! सध्या शहरात खास करून भाजप सरचिटणीस आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे विश्वासू लॅपटॉप मॅन सारंग कामतेकर यांच्या गोटात तर यावर बरीच चर्चा सुरु आहे....! अर्थात त्याला कारण ही तसेच आहे म्हणा...! आता जर या लॅपटॉप मॅनच्या घरचीच सून जर प्रियांका गांधी होणार असेल तर चर्चा तर होणारच... पण आम्ही तुमची उत्सुकता फार ताणत नाही...! पिंपरी चिंचवडकरांची सून प्रियांका गांधी होणार यात शंका नाही पण तुमच्या मनात ज्या प्रियांका गांधींचे चित्र उभे राहतेय त्या प्रियांका गांधी नक्कीच नाहीत...!
प्रियंका गांधी....राजकारणातल्या ताकतवान घरातील व्यक्ती...! त्यांचा रॉबर्ट वढेरांशी विवाह झालाय हे सर्वांनाच माहीत आहे..! त्यांचा संसार ही चांगला चाललाय...! मग तुम्हाला प्रश्न पडला असेल पिंपरी चिंचवडकरांचीही प्रियांका गांधी सून होणार कशी...? तुमचा प्रश्न बरोबर आहे..पण ही प्रियांका गांधी वेगळी आहे...! पिंपरी चिंचवड चे भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे विश्वासू आणि लॅपटॉप मॅन म्हणून प्रसिध्द असलेल्या सरचिटणीस सारंग कामतेकर यांचा मुलगा समर लग्न करतोय....! आणि याच समरचे लग्न प्रियांका गांधीशी होणार आहे....! पण ही प्रियांका मूळची अहमदाबादची आहे तर राहायला ती पिंपरी चिंचवडमध्येच आहे... अगदी लहानपणापासून समर आणि प्रियांका एकत्र शिकत होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले... आणि तब्बल आठ वर्षे रिलेशीनशीप मध्ये राहायल्यानंतर ते लग्न करतायेत...!
आता लग्न म्हटल्यानंतर काही तरी फिल्मी ड्रामा झाला असेल असं आपल्याला वाटेल... पण तसा ड्रामा झाला नसला तरी गम्मत मात्र खूप झाली... !
सध्या शहराचं राजकारण ज्यांच्या भोवती फिरतंय त्या लक्ष्मण जगताप यांच्या विश्वासू सरचिटणीसाच्या मुलाचे लग्न म्हणजे चर्चा तर होणारच...! त्यातच सारंग कामतेकर जगताप यांच्या बरोबरच्या जवळकीमुळं सध्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत त्यांचा तिरस्कार करणारा आणि त्यांना मानणारा वर्ग ही आहे. पण एकूण राजकीय परिस्थितीचा विचार केला तर त्यांचे शत्रूच अधिक... हे झालं त्यांचे सध्याचे स्टेटस... पण ते ज्या घरातून आले ते घर गेल्या दोन पिढ्यांपासून काँग्रेसच्या विरोधातील... अर्थात काँग्रेस म्हणजे गांधी घराण्याशी संघर्ष...!
सारंग कामतेकर यांनी तर शिवसेनेत असताना आणि आता भाजप मध्ये असताना आतापर्यंतच्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेस पर्यायाने गांधी घराण्याशी संघर्ष केला... ही पार्श्वभूमी असताना समरने सारंग कामतेकर यांना आपल्याला लग्न करायचे आणि ते ही प्रेम विवाह करायचा आहे हे सांगितलं...! साहजिकच कामतेकरांनी टिपिकल बापाप्रमाणे मुलीची माहिती विचारली.. आणि शेवटी समरने मुलीचे आडनाव सांगितले... गांधी आडनावं ऐकल्यावर साहजिकच कामतेकर काहीसे अचंबित झाले.. त्यानंतर मुलीचे नाव प्रियंका म्हटल्यावर तर त्यांचे हाव भाव कसे असतील हे न सांगितलेलंच बरं...! अर्थात त्यानंतर घरात बराच वेळ हास्यकल्लोळ झाला आणि अखेर समोरच्या लग्नाला परवानगी मिळाली...! साहजिकच सध्या अनेकांचे लक्ष असलेल्या आणि अनेकांच्या जवळच्या असलेल्या कामतेकरांच्या घरातला हा किस्सा हळू हळू बाहेर पडला आणि बऱ्यापैकी शहरातल्या किमान भाजपच्या गोटात तर याची जोरदार चर्चा सुरु आहे...!
सारंग कामतेकर निश्चितच राज्य पातळीवरचं मोठे राजकीय नाव नाही. पण पिंपरी चिंचवड पुरते बोलायचे झाले तर सध्या महापालिकेच्या राजकारणाचे ते केंद्र बिंदू आहेत. त्याच्यामुळं सध्या त्यांच्या मुलाच्या लग्नामुळं झालेली ही चर्चा आणि गम्मत सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न...! अर्थात लग्न हा त्यांचा खाजगी विषय असला तरी शहरातले राजकीय व्यक्तिमत्व म्हणूनच लिहण्याचा प्रपंच... ! अर्थात समर आणि प्रियांकाला आमच्याकडून सुखी संसारासाठी लाख लाख शुभेच्छा ...!