कैलास पुरी, झी मीडिया पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड भाजप मध्ये नव्या जुन्याचा संघर्ष सुरु असताना आता आणखी एक नवा संघर्ष सुरु होण्याची चिन्ह आहेत. तो म्हणजे दोन आमदारांच्या पडद्यामागच्या सूत्रधारांचा... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्मण जगताप... गेल्या काही दिवसात शहराचे नेतृत्व करू पाहणाऱ्या या नेत्याचा उजवा हात म्हणून ल्यापटॉप म्यान अर्थात सारंग कामतेकर यांच्या कडे पहिले जाते. पडद्यामागे सारंग कामतेकर हेचं सूत्र हलवत असल्याची चर्चा शहरात गेली कित्येक दिवस सुरु आहे... महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणाला पक्षात घ्यायचे, कोणाला नाही, कोणाचे तिकीट बसवायचे या सर्व निर्णयात ल्यापटॉप म्यान ची भूमिका महत्वपूर्ण होती आणि राहणार असल्याचे स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लक्ष्मण जगताप यांना सावरत विधानसभेमध्ये भाजपात प्रवेश करण्यापासून त्यांच्या विजयामध्ये कामतेकर यांनी महत्वाची भूमिका बजावल्याने लक्ष्मण जगताप यांचा ही त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. शहराचे भावी नेतृत्व म्हणून लक्ष्मण जगताप यांना प्रोजेक्ट करण्याचे काम करण्याच्या प्रयत्नात कामतेकरआहेत. पण त्यांच्या या मोहिमेला मोठा अडसर निर्माण झाला आहे. जगतापांच्या या ल्यापटॉप म्यान ला दुसऱ्या एका त्यांच्या सारख्याच धूर्त सूत्रधाराच आव्हाण निर्माण झाल आहे.


ते म्हणजे महेश लांडगे यांच्या पडद्यामागच्या सूत्रधाराचे...! नव्यानेच भाजप मध्ये दाखल झालेल्या महेश लांडगे यांचं ही राजकीय वजन वाढले आहे. त्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे कार्तिक लांडगे या त्यांच्या पडद्यामागच्या सूत्रधाराने... कार्तिक लांडगे यांना ल्यापटॉप म्यान सारखे कोणते नाव मिळाले नसले तरी, सोशल मिडिया वर त्यांचा असलेला वावर आणि प्रभुत्व पहाता ते ट्विटरबाबा नक्की आहेत..महेश लांडगे यांची राजकीय व्युवरचना कार्तिक लांडगे पाहतात... ते ही ल्यापटॉप म्यान इतकेच डावपेचात धूर्त आहेत. आता आपल्या आपल्या नेत्यांना शहराच्या पटलावर अधिका अधिक ताकतवान करण्यासाठी ल्यापटॉप म्यान आणि ट्विटरबाबा डावपेच टाकणार आणि एका नव्या संघर्षाचे शहर साक्षीदार होणार अशी चिन्हे आहेत...! सारंग कामतेकर आणि कार्तिक लांडगे दोघे ही धूर्त आणि डावपेचात माहीर आहेत. त्यामुळे संघर्ष अटळ आहे...! सारंग कामतेकर साम,दाम,दंड,भेद,नीती


 हे सर्व हवे तसे वापरण्यात वाकबगार आहेत. कार्तिक लांडगे यांनी तर विलास लांडे यांच्या सारख्या तगड्या विरोधाला चीत पट करण्यासाठी अनेक डावपेच वापरले. अगदी विविध कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांच्या आवाजात फोन करण्यासाठी खास डबिंग आर्टिस्टचा ही त्यांनी खुबीने वापर केल्याची चर्चा तर लांडे यांच्या पराभवानंतर किती तर दिवस सुरु होती. त्यामुळे महेश लांडगे यांचा ट्विटरबाबा आणि जगताप यांचा ल्यापटॉप म्यान हा संघर्ष उघडपणे जरी दिसला नाही तर पडद्यामागे मात्र जोरदार रंगणार हे सांगायला पिंपरी चिंचवड मध्ये कोणत्या ज्योतिषाची गरज नाही..


पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार हेच सर्वमान्य नेते आहेत ही वास्तुस्तिथी आहे. पण नजीकच्या काळात शहरात स्थानिक नेतृत्व उभे राहण्याची शक्यता आहे. आणि ती संधी महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप या दोघांनाही आहे. त्याच मुळे  आगामी काळात दोन्ही नेते आपली ताकत वाढवण्यासाठी प्रयत्न करणार यात शंका नाही.पण एका मोठ्या झाडाच्या सावलीत दुसरे मोठे झाड वाढत नाही हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे शहराचे नेतृत्व कोणा तरी एका नेत्याकडे जाणार आहे. आणि ते नेतृत्व कोण करणार हे पडद्यामागच्या डावपेचात माहिर असलेल्या ल्यापटॉप म्यान अर्थात किंवा नव्यानेच उदयाला येत असलेले ट्विटरबाबा अर्थात कार्तिक लांडगे यांच्यात कोण जिंकते यावर ठरण्याची चिन्हे आहेत..अर्थात हे व्हायला अजित पवारांचा शहरातला करिश्मा संपण्याची गरज आहे. तो संपतोय की राहतोय हे महापालिका निवडणुकीत कळलेच पण तूर्तास तरी किमान भाजप मध्ये कोण किती ताकतवाण हे दाखवण्यासाठी तर लढाई सुरू झालीय हे खरे...!