प्रदीप नहिदे, फिलाडेल्फीया : तुम्ही रासायनिक हल्ल्यांबद्दल आजवर जाणून घेतले आहे का? त्यात कोणती जीवघेणी रासायनिक पदार्थ वापरली जातात? आणि त्यांचे मानवावर तसेच सजीवसृष्टीवर होणारे दीर्घकालीन परिणाम ह्या बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरे महायुद्ध झाले त्यानंतर अमेरिकेने ६ आणि ९ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमा आणि नागासाकी ह्या जपानच्या दोन मुख्य शहरांवर केलेले प्राणघातक हल्ले आजही आपल्या अंगावर शहारे आणतात. ह्या दोन दिवसांच्या हल्यांमध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकांचे बळी गेले. यामध्ये वापरल्या गेलेली आण्विक शस्त्रे मुख्यत: प्लुटोनियम-२३९ आणि युरेनियम-२३५ अशा दोन घटकांनी बनलेली होती ज्यांचा परिणाम हा वर्षानुवर्षे सजीव सृष्टीवर आजही दिसून येतो. आज ऐकविसाव्या शतकात रासायनिक आणि जैविक युद्धाचा वापर करण्यात कोणताही देश मागे नाही. नुकत्याच झालेला सिरीया मधील "सरीन गॅसने" केलेला रासायनिक हल्ला या वरून तुम्हाला ह्याची जाणीव झालीच असेल. ह्या सर्व हल्ल्यांचा तीव्र निषेध आपण केलाच पाहिजे. नाहीतर त्यांचा दीर्घकालीन वापर सुरूच राहील. 


रासायनिक हल्ला म्हणजे काय?


कोणत्याही प्रकारच्या युद्धांमध्ये विषारी रसायनांचा वापर करणे म्हणजे रासायनिक हल्ला. २२ एप्रिल १९१५ रोजी बेल्जियम देशातील "लेपर" ह्या शहरात सर्वात मोठ्या प्रमाणावर पहिला रासायनिक हल्ला "क्लोरीन" गॅसच्या रुपात झाला होता. लाखोंच्या वर झालेली प्राणहानी आणि त्याचे अजूनही दुष्परिणाम तिथे दिसून येतात. जागतिक पहिल्या महायुद्धात तेव्हा "फोस्जीन" आणि "सल्फर मस्टर्ड" ह्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला होता. त्यानंतर विविध देश स्वत:च्या संरक्षणासाठी अशा जीवघेण्या विषारी रसायनांचे उत्पादन करु लागले. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन अशा दोन देशांकडे हजारो टन मध्ये असलेले रासायनिक शस्त्रे संपूर्ण पृथ्वी तलावावरील सजीव सृष्टीला नष्ट करायला पुरेसी होती. त्यानंतर इराक ने १९८०  मध्ये इराणवर "सल्फर मस्टर्ड" ने रासायनिक हल्ला घडवून आणला. इतिहासात असे अनेक रासायनिक हल्ले आहेत ज्यांमध्ये विविध रासायनिक विषारी पदार्थ वापरली गेलीत. आजवर सर्वच देशांकडे मोठ्या प्रमाणावर रासायनिक अण्वस्त्रे आहेत आणि त्यांचा वापर केला जातोय. विज्ञानात जेवढी प्रगती होताना दिसून येते तसेच गैरवापर सुद्धा दिसून येत आहे. अनेक वेळा रासायनिक युद्धावर बंदी आणून सुद्धा सिरीया सारखा देश त्याचा वापर करीत आहे. 


कोणती आहेत ती रासायनिक विषारी पदार्थ ? 


विसाव्या शतकापर्यंत वापरण्यात आलेली अशी एकूण ७० वेगवेगळी विषारी रसायने आहेत.


तसेच अनेक प्रकारची विषारी रसायने आहेत ज्यांची केमिकल नावे खालीलप्रमाणे-


Benzyl Bromide, Benzyl Chloride, Bromoacetone, Bromobenzyl Chloride, Xylyl bromide, Ethyl Iodoacetate. Trichloromethyl chloroformate, Capsaicin, Dibenzoxazepine, Chloracetophenone, Chloromethyl Chloroformate, Adamsite, Diphenylchloroarsine, Diphenylcyanoarsine, Molodorants- Skunk(Weapon), Incapacitating agents, Psychological agents- 3-Quinuclidinyl benzilate, Phenylcyclidine, Lysergic acid diethylamide. KOLOKOL-1 (tranquillizer), Lethal agents, Blister agent-Skin problems, Vesicants-Skin diverse issues, Nitrogen Mustards., Sulphur Mustards, Arsenicals, Urticants, Blood agents- Hydrogen Cyanide, Arsine, Cyanogen chloride, Choking agents- Chlorine, Chloropicrin, Diphosgene, Phosgene, Nerve agents- Tabun, Sarin, Soman, cyclosarin, GV, Novichok, VE, VG, VM, VX आणि Saxitoxin. 


अनेक लोकांना अशा विविध प्रकारच्या रसायनांची माहिती नसते. ह्या सर्व रसायनांचा संपूर्ण सजीव सृष्टी वर खूप मोठा घातक परिणाम होतो. ज्यांवर मोठ्या प्रमाणात औषधी लवकर उपलब्ध होत नाहीत. ज्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो तिथून शुद्ध हवेच्या ठिकाणी पलायन करणे, पाण्याने संपूर्ण अंग धुवून काढणे, रसायनांच्या संपर्कात आलेली अंगावरील कपडे काढणे आणि तत्काळ दवाखान्यात धाव घेणे महत्वाचे ठरते.