मुंबई: बॉलीवूड अभिनेता इरफान खानचा 'हिंदी मीडियम' चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कहाणी चांदणी चौकातील एका जोडप्याच्या प्रेमकथेवर आधारित आहे.
 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाचे दिग्दर्शक साकेत चौधरी यांनी सांगितले की, चित्रपट 31 मार्च 2017 रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन आणि भूषण कुमार करणार आहेत


'मदारी', 'जजबा', 'पिकू', 'गुंडे', 'लंचबॉक्स'  या बॉलीवूड चित्रपटांबरोबरच ऑस्कर विजेता अभिनेता टॅाम हॅंक्स सोबतचा 'इंफर्नो', 'लाईफ ऑफ पी', 'ज्युरासिक वर्ल्ड'  या हॅालिवुड चित्रपटांमध्ये देखील इरफान खानने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.