मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान बॉलिवूडच्या टॉप अॅक्टर्समध्ये गणला जातो. त्याची लोकप्रियता ही जगभरात आहे. 25 वर्षापासून तो बॉलिवूडमध्ये काम करतोय. मुंबईत बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार राहतात. सलमान खान देखील त्याच्या जन्मापासून आपल्या आई-वडिलांसोबत गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. पण आता सलमान खानने हे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खान कुटुंबियातील प्रत्येकासाठी गॅलेक्सी अपार्टमेंट हे खास आहे. सलमानचं संपूर्ण कुटुंब हे या घरात एकत्र राहतात. अरबाज आणि सोहेल देखील आधी याच घरात रहायचे पण काही वर्षांपासून ते आपली मुलं आणि पत्नीसोबत दुसरीकडे शिफ्ट झाले. या घरात आता सलमान त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो. सूत्रांच्या माहितीनुसार अनेक दिवसांपासून सलमानची गर्लफ्रेंड लूलिया देखील याच घरात राहत होती.


सलमानच्या प्रत्येक फॅनसाठी हे घर खास आहे. पण सलमानने आता हे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खान आता दुसऱ्या घरात शिफ्ट होणार आहे. सलमान खानने बांद्रा येथील लिंकिंग रोडवर एक छोटी बिल्डींग विकत घेतली आहे. लिटिल स्टार असं या बिल्डींगचं नाव आहे. सध्या येथे रिडेव्हलेपमेंटचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण होताच सलमान खान त्याची आई सलमा खान, हेलेन आणि पिता सलीम खान यांच्यासोबत शिफ्ट होणार आहे. लूलिया देखील याच घरात राहणार असल्याचं बोललं जातंय.


सलमान लवकरच लूलियासोबत विवाह बंधणात अडकणार आहे. त्यामुळे त्याने दुसऱ्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.