मुंबई : विराट आणि अनुष्का यांच्या ब्रेकअपच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. ब्रेकअप का झाला याचे तर्क-वितर्क लावले जातायंत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटने लग्नासाठी विचारल्यामुळे ब्रेकअप झाल्याचं अगोदर बोललं जात होतं त्यानंतर अनुष्काच्या स्वभावामुळे विराटने हे ब्रेकअप केल्याचं म्हटलं गेलं पण खरं कारण हे जरा वेगळंच आहे.


ब्रेकअप मागची खरी गोष्ट ती पैसा. पैशामुळे दोघांचा ब्रेकअप झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.


अनुष्का शर्माच्या एका मित्राने याबाबत खुलासा केला आहे. विराटने अनुष्काच्या बॉम्बे वेल्वेट या सिनेमासाठी ४० कोटी लावले आहेत.


अनुराग कश्यपच्या या ड्रीम प्रोजेक्टमध्ये रणवीर कपूर ही होता आणि करण जोहर देखील या सिनेमामध्ये काम करणार होता.


१२० कोटीचं बजेट असलेल्या या सिनेमाने सर्वांचीच निराशा केली. रिलीज झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात या सिनेमाने १६ कोटी कमावले. त्यामुळे हा सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा ठरला. 


विराटने जेव्हा सिनेमाच्या अपयशानंतर पैशांबाबत विचारलं तर अनुष्काला राग आला आणि तिने रिलेशनशिप तोडलं. अनुष्का काही दिवस यानंतर शांत होती. विराटला पण वाटलं की आता त्याला त्याचे पैसे परत मिळणार नाही. पण विराटला अनुष्का सोबत रिलेशनशिप ठेवायचंय.


अनुष्का देखील आता या सगळ्या गोष्टीमधून बाहेर आली आहे. सलमान खान सोबत ती सुल्तान सिनेमा करतेय. तर दुसरीकडे विराट कोहली देखील वर्ल्डकप मध्ये व्यस्त झालाय.