मुंबई : गेल्यावर्षी अकरावी प्रवेशाच्या तब्बल 56 हजार जागा रिक्त राहील्या असताना यंदा मुंबईत 39 नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेशात 4 हजार प्रवेश जागांची वाढ होणार आहे. मात्र रिक्त जागांची संख्या वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 


त्यामुळे अशा परिस्थितीत शिक्षण विभागाने नविन 39 कॉलेजांना मान्यता कशाच्या आधारावर दिली असा प्रश्न समोर येतो. प्रवेशाच्या जागा रिक्त राहणार असतील तर नविन कॉलेजांचा अट्टाहास कुणासाठी असाही सवाल उपस्थित केला जातोय. 


दरम्यान, फीवाढ करणा-या शाळांची सुनावणी घेणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात स्पष्ट केलंय. आतापर्यंत १८ शाळांची तक्रार आलीय. यापैकी सात शाळांची सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्यानं इतर शाळांची सुनावणी घेणार असल्याचं तावडेंनी सांगितलंय.


तसंच शाळांनी पुस्तकं घेण्यास जबरदस्ती केली तर शिक्षण विभाग कारवाई करणार असल्याचंही आश्वासन त्यांनी दिले आहे.