तिरुवंतपुरम : केरळ मेडीकल कॉलेज एका निर्णयामुळं वादात सापडले आहे. महाविद्यालय प्रशासनानं मुलींसाठी ड्रेस कोड जाहीर केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीन्स आणि आवाज करणारे आभुषणं घालण्यास मनाई करण्यात आलीये. त्यामुळे या निर्णयावरुन तरुणाईमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. जीन्स घालण्यास गैर काय ? असा सवाल महाविद्यालयीन तरुणी विचारत आहेत.


तिरुवंतपुरम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना जीन्स, टी-शर्ट आणि लेंगिज वापरण्यावर बंदी घातली आहे. तसेच कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पांढऱ्या रंगाचा ओव्हरकोट घालणे बंधनकारक आहे. तसेच ओळखपत्रही सक्तीचे केले आहे. याबाबतर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


सध्या विद्यार्थिनींसोबत गैरव्यवहार आणि छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या ड्रेसकोडच्या मदतीने विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित राहिल आणि विद्यार्थिनींना देखील कोणताही त्रास होणार नाही, असे कॉलेज प्रशासन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 


दरम्यान, कॉलेजमध्ये ड्रेस कोड ही नवीन गोष्ट नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी पालन करत नव्हते. कॉलेजचे नियम धुडकावून चालणार नाही. तेव्हा या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, म्हणून हा निर्णय घेण्यातल्याचे सांगण्यात येत आहे.


काय आहेत या अटी?


- विद्यार्थ्यांनी फॉर्मल कपडे आणि बूट वापरावेत 
– विद्यार्थींनीनी साडी किंवा चुडीदार वापरणे
– कोणतीही फॅशनेबल हेअर स्टाईल करू नये
– महागड्या आणि वाजतील असे दागिने वापरू नये