नवी दिल्ली : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटीमध्ये फायनल प्लेसमेंट गुरूवारी सुरू होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच आयआयटी विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट आणि ऑरेकल कंपन्याकडून एक कोटी पगारची ऑफर मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या या दोन नावाजलेल्या टेक्नॉलॉजी कंपन्या मुंबई, खडगपूर, गुवाहाटी आणि रूकडी येथील आयआयटी कॅम्पसमध्ये इंटरनॅशनल सॅलरी पॅकेज जाहीर करणार आहे. परंतु किती विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल सॅलरी पॅकेज देणार हे निश्चित नाही आहे.


इंटरनॅशनल जॉबसाठी मायक्रोसॉफ्ट १ लाख ६ हजार डॉलरची ऑफर देऊ शकते. तर ऑरेकल यापेक्षा कमी पगाराचे पॅकेज देऊ शकते, बेसिक पगारात इम्प्लॉई स्टॉक
ऑप्शन, ज्वाइनिंग बोनस आणि रिलोकेशन कॉस्ट मिळून एकूण पगार 1.2 कोटी रूपये असणार आहे.


आयआयटीमध्ये फायनल प्लेसमेंट 1 डिसेंबरला सुरू होते. त्याला 'डे 1' या नावाने देखील ओळखले जाते. त्या दिवसापासून कंपनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही कामांसाठी इंजिनिअर्सची भरती करणार आहेत. इंटरनॅशनल ऑफर ह्या प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशीच दिल्या जातात.


गूगल टेक्नॉलॉजी कंपनी यावर्षी आयआयटी कॅम्पसमध्ये जाणार नसून ते थेट उमेदवारांना निवडण्याच्या तयारीत आहेत. अशाप्रकारे पगाराच्या ऑफर देणे ही नवीन गोष्ट नाही परंतू या पगारापर्यंत पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे.