आठवीच्या पुस्तकातून नेहरुंना वगळले
राजस्थानमध्ये आठवीच्या पाठ्यपुस्तकातून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा धडा वगळण्यात आलाय. आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत असलेल्या पाठ्यपुस्तकात नेहरुंची माहिती असलेला धडा होता.
अजमेर : राजस्थानमध्ये आठवीच्या पाठ्यपुस्तकातून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा धडा वगळण्यात आलाय. आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत असलेल्या पाठ्यपुस्तकात नेहरुंची माहिती असलेला धडा होता.
नेहरुंनी बॅरिस्टर झाल्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता.. तसंच त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं आणि त्यांना देशाचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान मिळाला अशी माहिती या धड्यात होती.
मात्र आता आठवीच्या नवीन पुस्तकात असा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. राजस्थान माध्यमिक शिक्षण बोर्ड अजमेरमधील आठवीच्या पुस्तकातील सामाजिक विज्ञान संशोधन पुस्तकातून ही सर्व माहिती वगळण्यात आलीय.
हे पुस्तक बाजारात उपलब्ध नसले तरी राजस्थान पाठ्यपुस्तक मंडळाच्या वेबसाईटवर ते अपलोड करण्यात आलंय. पुस्तकात स्वातंत्र्यसैनिक हेमू कालानी, वीर सावरकर, महात्मा गांधी, भगत सिंग, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख कायम ठेवण्यात आलाय.