गणपती बाप्पासाठी बनवा बेसनाचे लाडू
बेसनाचे लाडू हे प्रत्येकालाच आवडतात. गणेशोत्सवात बेसनाच्या लाडूला अधिक पसंती असते. या उत्सवाला आणखी गोड बनवण्यासाठी तुम्ही घरीच बेसनाचे लाडू बनवू शकता.
मुंबई : बेसनाचे लाडू हे प्रत्येकालाच आवडतात. गणेशोत्सवात बेसनाच्या लाडूला अधिक पसंती असते. या उत्सवाला आणखी गोड बनवण्यासाठी तुम्ही घरीच बेसनाचे लाडू बनवू शकता.
बेसनाचे लाडू बनवण्याची पद्धत
साहित्य : 500 ग्रॅम बेसन, 500 ग्रॅम पिठी साखर, 200 ग्रॅम शुद्ध तूप, 1 चमचा वेलची पावडर.
कृती: एका भाड्यांत तूप गरम करुन, त्यात बेसन टाका आणि बेसनाला लालसर रंग येईपर्यंत मंद गतीवर गरम करा.
बेसन लालसर भाजल्यानंतर त्यात पिठी साखर टाकून ते मिश्रण थंड करावे.
मिश्रण थंड झाल्यावर हाताला थोडं तूप लावून त्या मिश्रणाचे गोल लाडू बनवावे.