तुरटीचे हे १० फायदे घ्या जाणून
पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुरटीचे केंसांसाठी त्वचेसाठीही अनेक फायदे होतात.
मुंबई : पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुरटीचे केंसांसाठी त्वचेसाठीही अनेक फायदे होतात.
१ तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. केस घनदाट करण्यासाठी कोमट पाण्यात तुरटी आणि डीप कंडिशनर समप्रमाणात मिसळून केसांना लावा. १५-२० मिनिटांनी थंड पाण्याने केस धुवा. आठवड्यातून एकदा हे करा.
२. मॅग्नेशियममुळे शरीरातील हानिकारक पदार्थ निघून जातात. गरम पाण्यात एक कप तुरटीची पावडर टाकून १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा. या पाण्याने आंघोळ करा. आठवड्यातून २-३ वेळा असे केल्यास बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते.
३. सनबर्न झालेल्या जागी एक कप पाण्यात दोन चमचे तुरटी पावडर टाका आणि प्रभावित जागी लावा. १० मिनिटांनी धुवून टाका.
४. बाथटबमध्ये तुरटीची पावडर टाकून स्नान केल्यास हृद्यासाठी उत्तम.
५. आर्थाराईट्समध्येही तुरटीचा फायदा होतो. गरम पाण्यात तुरटी टाकून शेक दिल्याने आराम मिळतो.
६. तणाव कमी करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा पाण्यात तुरटी टाकून आंघोळ करा.
७. मसल्स रिलॅक्स होण्यासाठी तुरटी पाण्यात टाकून स्नान करु शकता.
८. त्वचेवरील डेड स्किन काढण्यासाठी एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा तुरटी पावडर टाकून स्किनला मालिश करा.
९. पायांचे स्नायू दुखत असल्यास तुरटीच्या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून ठेवा. दिवसातून एकदा हे केल्यास नक्की फायदा होतो.
१०. शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर त्या फिटकरीच्या पाण्याचा शेक दिल्याने दुखणे बरे होते.