मुंबई : चेहऱा सुंदर बनवण्यासाठी मुली काय करत नाहीत. महागातील महाग उत्पादनांचा वापर केला जातो. आठवड्यातून दोनवेळा पार्लरला जातात. मात्र ही केमिकल उत्पादने तुमच्या चेहऱ्यासाठी नुकसानकारक असतात. तुमच्या चेहरा सुंदर बनवण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करु शकता. कच्चे दूध चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम यासारखी तत्वे असतात. 


हे आहेत याचे फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचा टोनर म्हणून तेलकट त्वचेसाठी उपयोग होऊ शकतो. यासाठी थोड्याश्या कच्च्या दुधात काही थेंब लिंबाचे रस मिसळा. या मिश्रणाला चेहरा आणि मानेला लावा आणि काही वेळाने गरम पाण्याने चेहरा धुवा. 


त्वचा साफ करण्यासाठीही तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करु शकता. यासाठी दुधात थोडेसे मध मिसळून चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल. 


तुम्हाला ब्लॅकहेडची समस्या असेल तर कच्च्या दुधात गव्हाचा जाडा रवा मिसळा. याची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावा. ब्लॅकहेड्स दूर होतील. 


चेहऱ्यावर उजाळा आणण्यासाठी कच्च्या दुधात चंदन पावडर मिसळून चेहऱ्याला आणि मानेला लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. काही दिवसांतच चेहऱ्यावर तजेला येईल.


कच्च्या दुधाचा वापर क्लिंझर म्हणूनही केला जाऊ शकतो. चेहऱ्यावरील तेल, चिकटपणा, ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर फायदेशीर आहे.