मोसंबीचे ५ मोठे फायदे

मोसंबी हे आरोग्याच्या दृष्टीने शरिरासाठी अधिक फायदेशीर ठरणार फळ आहे. याच्या सेवनाने शरिराला अनेक फायदे होतात.
मुंबई : मोसंबी हे आरोग्याच्या दृष्टीने शरिरासाठी अधिक फायदेशीर ठरणार फळ आहे. याच्या सेवनाने शरिराला अनेक फायदे होतात.
मोसंबीचे ५ मोठे फायदे
१. मोसंबीचा ज्युस हा आरोग्यासाठी खूपच चांगला असतो. मोसंबीमुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते. मोसंबीमुळे शरिरातील अशक्तपणा दूर होतो आणि शरिरातील शक्ती वाढवण्यासाठी मोसंबीचा ज्यूस फायदेशीर आहे.
२. मोसंबीमध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा, केस, डोळे यासाठी ते अधिक फायदेशीर ठरतात. मोसंबीचं नियमित सेवन केल्यास त्वचा उजळते.
३. मोसंबीमध्ये पॅक्टीन आणि विटामीन सी सोबतच इतर पोषक तत्व सुद्धा असतात. जे कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करण्यासाठी मदत करतात. हृदयरोग होण्यापासून मोसंबी बचाव करते.
४. पोटासंबंधीत समस्यांवर मोसंबी गुणकारी ठरते. यामध्ये मोठ्या प्रमाणात फाइबर असतात. मोसंबीच्या ज्यूसमध्ये मीठ टाकून पिणे अधिक फायदेशीर ठरतं.
५. वजन कमी करण्यासाठी मोसंबी अधिक फायदेशीर ठरते. नियमित कोमट पाण्यात मोसंबीचा रस आणि मध एकत्र करुन प्यायल्याने लाभ होतात.