मुंबई : पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याची मजा काही औरच असते. वरुन पडणारा पाऊस, हवेत गारवा आणि हातात गरम गरम लिंबू आणि मसाला लावलेलं मक्याचं कणीस. कल्पना केली तरी तोंडाला पाणी सूटलं ना ? पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे आरोग्यासाठी फायदे देखील आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मक्याच्या कणसाचे 5 फायदे


1. मक्याचं कणीस खाल्यामुळे दात मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलांना देखील मका खाऊ घाला.


2. मक्याचे दाणे पूर्ण खाऊन झाल्यानंतर ते टाकून देऊ नका. मक्याचे 2 तूकडे करा आणि मधल्या भागाचा नाकाद्वारे सुंगध घ्या. यामुळे सर्दी कमी होते.


3. मक्याचं कणीस खाऊन झाल्यानंतर त्याला वाळवून ठेवा आणि त्यानंतर त्याला जाळून त्याची राख गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्याने कफचा त्रास कमी होऊ शकतो. 


4. आयुर्वेदात मक्याचं कणीस तृप्तीदायक, वातकारक, कफ, पित्तनाशक, मधूर असल्याचं म्हटलं आहे. भाजलेले कणीस हे कॅरोटीनायड विटामिन-एचं एक उत्तम स्रोत आहे.


5 भाजलेल्या कणीसपासून 50 टक्के अँटी-ऑक्सीडेंट्स वाढतं. कँसरवर देखील हे लाभदायक आहे.