मुंबई : केसांमध्ये कोंडा होणे ही समस्या आज अनेकांमध्ये दिसून येते. केसामध्ये कोंडा होण्यामागे अनेक कारणं असतात. केसांमध्ये कोंडा झाल्यास तुम्ही काही घरगुती उपाय करुन ही समस्या लांब ठेऊ शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केसात कोंडा झाल्यास ५ उपाय :


१. मेथीच्या पुडीला पाण्यात टाकूण लेप तयार करावा आणि तो  डोक्यावर लावावा. एक तासानंतर डोकं धुवून घ्यावे.


२. केस धुतांना लिंबाचा रस वापरल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.  


३. बीटची मुळं पाण्यात घालून पाणी उकळावं आणि त्या पाण्याने रोज रात्री डोक्याला मसाज करावा.


४. दोन-तीन दिवसाचे शिळे (आबंट दही), थोडासा लिंबाचा रस, व्हिनिगर आणि आवळ्याचा रस यांच्या वापरानेही कोंडा कमी करता येतो.


५. थंड पाण्याने केस धुवून अत्यंत जोराने केसांना मुळापर्यंत बोटांनी घासणे यामुळे केस गळती आणि कोंडा होत नाही.