मुंबई : अनेकदा असं होत की लग्नानंतर सर्व काही नॉर्मल होतं मात्र अचानक असं काही घडतं की ज्यामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा येऊ शकतो. अनेकदा बेडरुममध्ये अशा काही चुका घडतात ज्यामुळे त्यांच्या नात्यावर परिणाम होतो. अनेकदा ही नाती तुटण्याच्या मार्गावर येतात. मात्र काही नियम पाळल्यास तुम्ही या चुका टाळू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. तुम्ही वेगळे बेडरुममध्ये झोपत असाल तर हे ध्यानात ठेवा की दोघांनी एकत्र झोपण्यास जा. बायको स्वयंपाकघरात काम करतेय आणि नवरा बेडरुममध्ये झोपलाय असे नको.


२. झोपण्यास जात असताना मोबाईल दूर ठेवा. लॅपटॉप, मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा आपल्या जोडीदाराशी संवाद साधा.


३. बेडरुममध्ये ऑफिसातल्या कटकटी, तेथील राजकारण तसेच मेडच्या वाईट सवयी यावर चर्चा करु नका. यावेळी दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला हवा. 


४. आपल्या जोडीदाराला जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल याकडे लक्ष द्या. अनेकदा छोट्याशा स्तुतीवरुन जोडीदार खुश होतो. प्रेमाच्या गोष्टी तुमचे नाते दृढ होण्यास मदत करतात. 


५. बेडरुममध्ये चांगले वातावरण कसे राहील याकडे लक्ष द्या. एकमेकांची स्तुती करा.