मुंबई :  लसूण मसालेदार खाण्याचे स्वाद वाढवतो. तसेच याचे गुणकारी आणि आरोग्यदायी फायदे खूप आहेत. लसूण आणि मध एकत्र मिक्स केल्याने आरोग्याचा खूप मोठा खजिना तुमच्याकडे येतो. असे केल्याने सौंदर्यासंबंधी समस्या दूर होऊ शरीर डिटॉक्स करण्यासाठी खूप मदत करतो. तसेच इन्फेक्शनही संपवतो. अशात मध आणि लसूण खाल्यास सात फायदे होतात. 


१) हृदयाला निरोगी ठेवतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसूण आणि मध यांचे मिश्रण खाल्याने हृदयाकडे जाणाऱ्या धमण्यांमधील ब्लॉकेजेस निघून जातात. यामुळे ब्लड सर्कुलेशन योग्य प्रकारे हृदयापर्यंत पोहते. 


२) सर्दी आणि पडसं दूर करते


हे मिश्रण खाल्याने सर्दी आणि पडसंसह सायनसचा प्रॉब्लेम खूप कमी होतो. हे मिश्रण शरिरातील उष्णता वाढते. आजारांना दूर ठेवते. 


३) इम्युन सिस्टीमला मजबूत करते


लसूण आणि मधाच्या मिश्रणाने तुमची इम्युन सिस्टिम मजबूत होते. यामुळे तुम्ही प्रत्येक ऋतूमध्ये तंदुरूस्त राहू शकतात. 


४) डायरियापासून बचाव 


कोणाला किंवा लहान मुलांना सतत डायरियाचा त्रास होत असेल तर त्यांना हे मिश्रण खाऊ घाला. त्यांचे पचन संस्था दुरूस्त होईल. तसेच पोटातील इन्फेक्शन दूर होईल. 


५) डिटॉक्स 


हे एक नैसर्गिक डिटॉक्स मिश्रण आहे. हे खाल्याने शरीरातील घाण आणि वेस्ट मटेरियल बाहेर पडते. 


६) फंगल इन्फेक्शन 


फंगल इन्फेशन, शरीराच्या कोणत्याही भागावर हल्ला करत असेल तर अॅन्टी बॅक्टेरियल गुणांचे हे मिश्रण त्या ठिकाणी लावल्यास बॅक्टेरिया दूर होतात.  शरीर कमजोर होण्यापासून वाचतो. 


७) घशाच्या इन्फेक्शनमध्ये लाभदायक 


हे मिश्रण घशातील संक्रमण दूर करते. यात अॅन्टी इन्फ्लेमेटरी गुण आहे. घरातील खरखर आणि सूज कमी करण्यात मदत करतो.