मुंबई : सावळी त्वचा असलेल्यांमध्ये उजळ त्वचेच्या व्यक्तींपेक्षा अधिक मिलेनिन असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, त्वचा गोरी असो किंवा सावळी काही वेळा हाताच्या कोपरांवरील त्वचा काळवंडलेली दिसते. हे अस्वच्छतेमुळे होत नाही, तर या भागात मृत पेशी साठल्याने हा भाग निश्तेज दिसत असतो. कोपरांवरील काळवंडलेपण या उपायांनी घालवता येईल.


 


१)  लिंबाचा वापर 


 चेह-यावरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी एक्सफॉलिएशन ही प्रक्रिया अत्यंत उपयोगी ठरते. त्याचप्रमाणे हाताच्या कोपरांनाही एक्सफॉलिएशन करा. अंघोळीच्या वेळेस शरीर स्वच्छ करण्यासाठी वापरला जाणारा लूफा त्यासाठी उपयोगी ठरतो. एक्सफॉलिएशन स्क्रब लावून लूफाने कोपराला चोळा. लिंबू दोन भागात कापा. लिंबाची एक फोड एका कोपरावर चोळा.


२) लिंबाचा रस


 काळवंडलेल्या त्वचेवर लिंबाचा रस व्यवस्थित लावला जाईल याची काळजी घ्या. १५ मिनिटांसाठी लिंबाचा रस कोपरांवर तसाच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने कोपर धुवा. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करा. 


३) बेकिंग पावडर 


 लिंबाच्या वापराने कोपर उजळ झाले नाहीत, तर अधिक तीव्र द्रावण तयार करता येईल. त्यासाठी पाव कप बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करा. तयार झालेल्या पेस्टने कोपरांवर २० मिनिटांपर्यंत मसाज करा. यामध्ये बेकिंग सोडा एक्सफॉलिएशनचे काम करतो, तर लिंबाच्या रसामुळे त्वचा उजळ होते. शेवटी कोमट पाण्याने कोपर धुवा. हा उपायदेखील आठवड्यातून तीन वेळा करावा. 


४) कोपराच्या त्वचेवर चट्टे, जळजळ होत असल्यास लिंबाच्या रसाचा वापर थांबवा. त्याऐवजी सौम्य द्रावण तयार करून वापरा. 


५) या खेरीज हळद, मध आणि दूध यांचे मिश्रणही  लावता येते.


६) साखऱ आणि ऑलिव्ह ऑईल. 


७) लिंबू आणि मध 


८) व्हिनेगर आणि दही