नॉनवेज खात असाल तर सावधान, हा असतो खतरा!
मांसाहार करणाऱ्यांनी प्रथम जाणून घेतले पाहिजे की त्याचे काय फायदे किंवा लाभ आहेत. मांसाहारातून कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन बी १२ अधिक प्रमाणात मिळते.
मुंबई : मांसाहार करणाऱ्यांनी प्रथम जाणून घेतले पाहिजे की त्याचे काय फायदे किंवा लाभ आहेत. मांसाहारातून कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन बी १२ अधिक प्रमाणात मिळते.
लहान मुलांची वाढ होताना मांसाहार केलेला चांगला असतो. कारण त्यातून अधिक प्रमाणात प्रोटीन आणि फॅट मिळतात.
शरीरातील अनेक प्रकारचे संक्रमण संरक्षण करते. अॅंटीबॉडी विकसित करण्यास मदत होते. तसेच इंफेक्शन रोखण्यास मदत करते.
मांसाहारी भोजन घेतल्याने दृष्टी चांगली होते. दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.
त्याशिवाय नर्वस सिस्टम योग्य राखण्यास मदत होते. बुद्धीचा विकास होण्यास मदत होते.
माशांमुळे ओमेगा ३ फेटी अॅसिड मिळते. त्यामुळे हृदयासंबंधीचे आजार दूर होतात.
आता पाहा काय आहे नुकसान
अती प्रमाणात मांसाहार करणे योग्य नाही. ते पचन्यास कठिण असते. त्यामुळे अपचन होऊ शकते.
मांसाहार केल्याने बीपी वाढतो.
वजन वाढण्यास मदत होते. कोलोस्ट्राल वाढीसाठी ते एक मोठे कारण आहे.
अभ्यासकर्त्यांच्या मते जास्त मांसाहार केल्याने लक्ष केंद्रीत करण्यात अडचणी येतात. त्यामुळे रागावर नियंत्रण राहात नाही. राग पटकन येतो.
जे शाकाहारी आहेत त्यांनी मांसाहाराकडे वळू नये. त्यांना जास्त त्रास होऊ शकतो. पोटाचे आजार, लिव्हर याला त्रास होऊ शकतो. पचण्यासाठी जड आहार असल्याने तो त्यांनी करु नये.