मुंबई : चेहऱ्यांवरच्या मुरुमांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर यावर रामबाण उपाय म्हणून वापरू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्वचेच्या विविध विकारांवर लिंबू उपयोगी ठरतो. लिंबूमध्ये असणाऱ्या अॅन्टी - बॅक्टेरियल गुणांमुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यांवरचे डाग आणि पिंम्पल्स दूर करू शकतात. 


१. लिंबाचा रस


एका वाटीत लिंबाचा रस घ्या. त्यात कापसाचा बोळा बुडवून ज्या ठिकाणी मुरुमं आणि डाग असतील त्या ठिकाणी हलक्या हातांनी फिरवा. हा रस १० मिनिटांपर्यंत राहू द्या. त्यानंतर पाण्यानं चेहरा धुवून घ्या. ही प्रक्रिया दिवसातून दोन वेळा करू शकता. 


२. लिंबाचा रस आणि मध


थोडा लिंबाचा रस आणि मध एकत्र करून मुरुमं असलेल्या ठिकाणी लावा... पाच मिनिटांपर्यंत ते चेहऱ्यावर ठेवून चेहरा धुवून घ्या. हा उपाय तुम्ही दिवसातून एकदा करू शकता. 


३. लिंबू आणि अंड्याचा सफेद भाग


एका अंड्याचा सफेद भाग वेगळा करून घ्या. यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिसळून चांगल्या पद्धतीनं एकजीव करून घ्या. हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर पाच ते सात मिनिटे लावा... ते सुकल्यानंतर धुण्याऐवजी पुन्हा एकदा या मिश्रणाचा एक थर लावा... त्यानंतर तिसरा थरही तुम्ही लावू शकता... त्यानंतर कोमट गरम पाण्यानं धुवून घ्या. 


४. लिंबू आणि चणे


एका वाटीत चण्याची पावडर घ्या त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून घ्या. त्याची चांगली पेस्ट बनवून पिंपल्स असलेल्या त्वचेवर लावू शकता. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या. त्वचा कोरडी वाटल्यास थोडं माइश्चरायजरचा वापर करू शकता. 


५. लिंबू आणि दही


एका वाटीत लिंबाचा रस आणि दही एकत्र करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. काही वेळानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या. 


या उपायांमुळे काही दिवसांतच तुमचा चेहरा उजळून निघेल... आणि पिंपल्सची तुमची समस्या कायमची दूर होईल.