मुंबई : बिअर पिणे जरी आरोग्यासाठी हानिकारक असले तरी चेहऱ्यासाठी त्याचे फायदे अनेक आहेत. बिअरमुळे त्वचेवरील छिद्रांमध्ये जमा झालेली घाण दूर करण्यास मदत करतात. यातील यिस्ट मुरुमांची समस्या दूर करतात. बिअर त्वचेवर लावल्यास इन्फेक्शन तसेच इतर समस्याही दूर होतात. 


हे आहेत बिअरचे फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. थोड्याशा बिअरमध्ये लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील ब्लॅक आणि व्हाईटहेड दूर होतात. त्याचप्रमाणे रंगही उजळतो. 


२. २ चमचे बिअरमध्ये अर्धा चमचा दही, ऑलिव्ह ऑईल आणि बदामाची पेस्ट मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावून मसाज करा. ५ मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे त्वचा मुलायम होईल तसेच ग्लो वाढेल.


३. अर्धा चमचा बिअर आणि एका अंड्याचा सफेद भाग मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. यामुळेही त्वचेचा ग्लो वाढण्यास मदत होईल.


४. एक चमचा टोमॅटोचा रस आणि बिअर एकत्रित करा. या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करा. ५ मिनिटांनी चेहरा धुवा. चेहऱ्यावरील डाग निघून जातील. 


५. एक चमचा बिअर, दही, मध आणि लिंबाचा रस एकत्रित करा. ही पेस्ट कॉटनच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावा. यामुळे मुरुमांची समस्या उद्भवणार नाही.