केसगळती रोखेल बीटाचा रस
सध्या केसगळतीची समस्या साधारण समस्या बनलीये. १० पैकी सहा ते सात जणांना ही समस्या सतावत असते. प्रत्येकाची केस गळण्याची कारणे वेगवेगळी असतात. ही कारणे शोधून काढल्यास त्यावर योग्य ते उपचार करता येतात. केसगळतीवर गुणकारी आहे बीट.
मुंबई : सध्या केसगळतीची समस्या साधारण समस्या बनलीये. १० पैकी सहा ते सात जणांना ही समस्या सतावत असते. प्रत्येकाची केस गळण्याची कारणे वेगवेगळी असतात. ही कारणे शोधून काढल्यास त्यावर योग्य ते उपचार करता येतात. केसगळतीवर गुणकारी आहे बीट.
पाण्यात बीटाची पाने उकळा. जेव्हा पाणी उकळून निम्मे होईल तेव्हा गॅस बंद करा. ही पाने काढून त्याची पेस्ट करुन घ्या. या पेस्टमध्ये एक चमचा हीना मिसळा. हे मिश्रण केसांना अर्धा तास लावून ठेवा. त्यानंतर केस धुवून टाका. आठवड्यातून चार वेळा हा प्रयोग करा. केसगळती लवकरच कमी होईल.
बीटाच्या रसात आल्यास रस मिसळून हे मिश्रण केसांना लावून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी केस पाण्याने स्वच्छ धुवा.
हळद पावडर, बीटाची पाने आणि आवळ्याची पाने एकत्रित करुन हे मिश्रण केसांना लावा. यामुळे केस गळणे कमी होईल.
केस गळण्याचे कारण म्हणजे पोटॅशियमची कमतरता. बीटामध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते यामुळे केस घनदाट आणि मजबूत होतात.